Sharad Pawar - Pratibha Pawar Sarkarnama
मुंबई

Pratibha Pawar Hospitalized : मोठी बातमी ! शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच क्रँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. प्रतिभा पवार यांच्यावर कुठली शस्त्रक्रिया केली जाणार आहे याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील रुग्णालयात आहेत.

राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. यावेळी अजित पवार (Ajit pawar) यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देत काही महत्वाच्या नेते आणि काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. तसेच दोन गटही निर्माण झाले आहेत. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी पवारांनी कंबर कसली आहे.

याचवेळी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्नी (Sharad Pawar Wife) आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या प्रकारची आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

शरद पवार हे राज्य आणि देशाच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असतात. मात्र, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Sharad Pawar Wife) यांनी केव्हाही राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. इतकेच नव्हे तर राजकीय कार्यक्रमांनाही त्या फारशा उपस्थित नसतात. अपवादात्मक स्थितीमध्ये त्या शरद पवारांसोबत किंवा स्वतंत्रपणे केव्हातरीच त्या अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी प्रतिभा पवार तिथे उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी त्यावेळी कोणतीही प्रतिकिया दिली नव्हती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT