Maharashtra Khate Vatap: अखेर खाते वाटप जाहीर; अजितदादांकडे अर्थ तर धनंजय मुंडेंकडे कृषी; कुणाला कोणतं खातं? पाहा यादी

Maha Cabinet Expansion: शिंदे गटाचे तीन खाते अजित पवारांच्या गटाला देण्यात आले; अब्दुल सत्तारांकडून कृषी खातं निसटलं...
Maha Cabinet Expansion
Maha Cabinet ExpansionSarkarnama
Published on
Updated on

Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर एका आठवड्यानंतर आज खाते वाटप जाहीर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून खाते वाटप रखडले होते. पण आज यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषीखातं देण्यात आलं आहे. या खातेवाटपाला राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Maha Cabinet Expansion
Supreme Court Assembly Speaker Notice : सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांना दणका ; सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यात उत्तर द्या !

अजित पवार गटाला कोणते खाते मिळाले?

- अजित पवार : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री

- - धनंजय मुंडे : कृषीखातं

- संजय बनसोडे : क्रीडामंत्री

- दिलीप वळसे पाटील : सहकारमंत्री

- छगन भुजबळ : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

- आदिती तटकरे : महिला बालविकास मंत्री

- हसन मुश्रीफ : वैदकीय शिक्षण मंत्री

- अनिल पाटील : मदत पुनर्वसन मंत्री

- धर्मरावबाबा आत्रम : अन्न व औषध पुरवठा

भाजपकडून सहा खाती अजितदादांच्या गटाला

- अर्थखातं

- वैद्यकीय शिक्षण खातं

- सहकार खातं

- क्रीडाखातं

- महिला आणि बालकल्याण खातं

- अन्न नागरी पुरवठा खातं

Maha Cabinet Expansion
Supreme Court MLA Disqualification: सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार ?

शिंदे गटाकडून अजितदादांच्या गटाला कोणते खाते दिले?

- कृषी खातं

- मदत आणि पुनर्वसन

- अन्न आणि औषध प्रशासन

दरम्यान, आधीच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये गटाकडून तीन आणि भाजपच्या मंत्र्यांकडून सहा खाती काढून राष्ट्रवादीला (अजित पवार गट) देण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला (अजित पवार गट) अर्थ, कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा आणि महिला व बालकल्याण असे महत्वाचे महत्त्वाची खाते मिळाले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com