CM Eknath Shinde and DCM Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : मोठी बातमी ! राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर

Ganesh Thombare

Mumbai News: मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी आयोगाचे आभार मानले. (State Backward Class Commission report submitted to Govt Maratha Reservation)

तसेच या अहवालावर योग्य तो निर्णय सरकार घेईल, असं आश्वासनही त्यांनी दिले. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावर कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशनातदेखील चर्चा करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाचे अभिनंदन करतो. एवढ्या जलद गतीने एवढा मोठा सर्व्हे आपण सुपूर्त केला. मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सांगितलं होतं. ते काम केलं. या अहवालासंदर्भात सरकार योग्य तो निर्णय घेईल. यासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन आपण बोलावलं आहे. त्यामुळे या अधिवेशनात राज्य सरकार योग्य ती चर्चा करेल आणि योग्य तो निर्णय घेईल, असं शिंदेंनी सांगितले.

आम्हाला विश्वास आहे की, अहवालावर टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देता येईल, असा विश्वास आम्हाला आहे. मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी निर्देश देण्यात आले होते.

यासाठी अनेकांनी काम केलं असून, ते आज पूर्ण झालं असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं, असं आवाहनदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

दरम्यान, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना या अहवालाद्वारे देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा लाभ होणार नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. त्यामुळे यावर आता काही प्रतिक्रिया येतात का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष काय म्हणाले ?

राज्य मागासवर्ग आयोगाने एक मोठी मोहीम फत्ते केली. मराठा समाजाचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला. आयोगाच्या या कामगिरीचं मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केलं. राज्य मागासवर्ग आयोगाने दोन कोटींपेक्षा अधिक लोकांचं सर्वेक्षण केले असून, त्यासाठी जवळपास साडेचार लाख कर्मचारी गुंतले होते, अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी दिली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT