Ravikant Tupkar News : '...तर जेलमधून निवडणूक लढणार', रविकांत तुपकरांचे भवितव्य आज ठरणार

Buldhana News : आपण मागील 22 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करतो. घरदारावर तुळशीपत्र ठेवून आंदोलन करत आहे. शेकडो केसेस दाखल झाल्या. अंगावर पोलिसांच्या लाठ्या खाल्या.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: विविध आंदोलनामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या जामीनावर आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. पोलिसांनी तुपकर यांचा जामीन रद्द करण्याची मागणी जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती. जामिनावर निकाल काहीही लागला तर लोकसभा निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहोत. वेळ प्रसंगी जेलमधून लोकसभेचा अर्ज भरू,असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. (Ravikant Tupkar News )

Ravikant Tupkar
Raju Shetti vs Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत बंडखोरी !

'न्यायालयाचा आदर राखत निकाल मान्य करणार. जर मला अटक झाली तरी आपण जेलमधून लोकसभेसाठी अर्ज भरणारच. आत असो वा बाहेर लोकसभा लढणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी न डगमगता कामाला लागा. लोकं आपल्यासोबत आहेत. मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी देत आहेत. आपल्याला जनतेतून मिळणारा प्रतिसाद बघून काही नेत्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे मला तुरुंगात टाकण्याचा घाट घातला जात आहे. मात्र मी त्याला घाबरत नाही. मी मैदानात लढणारा कार्यकर्ता आहे, मी माझी लढाई चालूच ठेवणार, असे देखील तुपकरांनी (Ravikant Tupkar) बुलढाण्यात झालेल्या निर्धार मेळाव्यात ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण मागील 22 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करतो. घरदारावर तुळशीपत्र ठेवून आंदोलन करत आहे. शेकडो केसेस दाखल झाल्या. अंगावर पोलिसांच्या लाठ्या खाल्या. तुरुंगात गेलो, घरापासून सहा सहा महिने दूर राहिलो. तडीपारी भोगले. 22 वर्षांत शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. अचानक गोधडीतून उठलो आणि लोकसभा लढणार असे नाही म्हटले. आधी काम केले आणि शेतकरी, तरुण व सर्वसामान्यांच्या आग्रहास्तव आपण लोकसभा लढण्याचे जाहीर केले आहे, रविकांत तुपकर म्हणाले.

अटकेवर निर्णय आज

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामिनावरचा निकाल आज (शुक्रवारी) होणार आहे. गुरुवारी (ता.15) दुपारी निर्धार मेळावा आटोपून जिल्हा सत्र न्यायालयात तुपकर हजर झाले होते. यावेळी तुपकरांच्या वतीने वकील त्यांच्या पत्नी ॲड.शर्वरी तुपकर यांनी काही कायदेशीर पुरावे दाखल केले. त्यावर युक्तिवाद करण्यासाठी सरकारी पक्षाने वेळ मागितल्याने आता याप्रकरणी आज (शुक्रवारी) निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

(Edited By Roshan More)

Ravikant Tupkar
Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरे आले तर युती करणार का? फडणवीसांचे थेट उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com