Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : जनता न्यायालयाच्या खेळीनंतर आता ठाकरेंसाठी दुसरा आशेचा किरण; सुप्रीम कोर्टाने साद ऐकली

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी महत्त्वाचा निकाल दिला. यात ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार पात्र ठरवितानाच त्यांनी खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यताही दिली.नार्वेकरांच्या या निकालानंतर ठाकरे गट चांगलाच चवताळला आहे.याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात कायदेशीर लढाईसाठी ठोस पाऊल उचलताना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर महापत्रकार परिषदेचा मास्टर स्ट्रोक खेळला. या पत्रकार परिषदेतून ठाकरेंनी आपली कायदेशीर पुरावे सादर करत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली आहे.पण विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर काहीसा अपसेट झालेल्या शिवसैनिकांमध्ये या महापत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा जोश संचारला आहे. याचवेळी आता ठाकरेंसाठी आणखी एक आशेचा किरण मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

आमदार अपात्रप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर या निकालाविरोधात ठाकरे गटाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी (दि.15) विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.आमदार अपात्रप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर सांगितले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरण मे 2023 मध्ये आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले होते.तसेच मर्यादित कालावधीत याबाबतचा निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, या सुनावणीला जून महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. परंतु, ही सुनावणी अखंडित होऊ शकली नाही. सुनावणीला वेग यावा आणि लवकर निकाल लागावा म्हणून ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा मर्यादित काळात निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार सुनावणी सुरू झाली.दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर याप्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता होती.परंतु,राहुल नार्वेकर यांनी पुन्हा वेळ वाढवून मागितला. यानंतर या प्रकरणी 10 जानेवारीला निकाल दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT