Shiv Sena News : उद्धव ठाकरेंसाठी आशेचा किरण! शिंदेंसोबत असूनही 'यांनी' अवाक्षरही काढले नाही

Thackeray vs Shinde Shiv Sena Politics : मुख्यमंत्री शिंदेंसोबत असलेले काही नेते उद्धव ठाकरेंसाठी आशेचा किरण?
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Group vs Shinde Group Shiv Sena :

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेतील बंडाला दीड वर्ष उलटले आहे. दरम्यान, शिंदे भाजपसोबत सत्तेत गेले, मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या बंडाला साथ देणाऱ्यांपैकी अनेकांना मंत्रिपदाची लाॅटरीही लागली. राज्यात ट्रीपल इंजिनचे सरकार कारभार हाकत असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेविरुद्ध शिंदे यांच्याबरोबर गेलेले अनेक नेते, मंत्री, आमदार रोज तोंडसुख घेत असतात.

आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार ही नावे त्यात आघाडीवर आहेत. पण शिंदेंसोबत बंडात सहभागी झालेले, पक्ष सोडून गेलेले मराठवाड्यात व राज्यात असेही अनेक नेते, मंत्री, आमदार आहेत ज्यांनी Uddhav Thackeray किंवा ठाकरे घराण्याबद्दल अवाक्षरही काढलेले नाही.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Dharashiv Loksabha : मैदानात तर या..! ओमराजेंनी भाजपला दिले आव्हान...

मराठवाड्यात आणि राज्यपातळीवर प्रवक्ते म्हणून संजय शिरसाट ठाकरेंवर तोफ डागण्यात सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. अगदी सुरत येथील हाॅटेलमधून उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पहिला बाॅम्बगोळा शिरसाट यांनीच टाकला होता. तेव्हापासून ते आजतागायत संधी मिळेल तेव्हा ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर तोंडसुख घेत असतात. पण शिंदेंच्या बंडाला भक्कम पाठिंबा देणाऱ्या मराठवाड्यातील अनेक नेते, आमदार असे आहेत, ज्यांच्या निष्ठा शिंदेंसोबत आहेत. तरीही ते ठाकरेंबद्दल चकारशब्द काढायला तयार नाहीत. यात सर्वात आघाडीवरचे नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल.

एकदा यासंदर्भात जैस्वाल यांना विचारले असता, आयुष्यात कधीच मातोश्री आणि तिथे राहणाऱ्या ठाकरे परिवाराबद्दल आपण अवाक्षरही काढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मातोश्री आणि ठाकरे कुटुंबामुळे आमची ओळख झाली. राजकारणात पद, प्रसिद्धी मिळाली. बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, मग त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल टीका कशी करणार? उठाव केला तो वेगळ्या कारणांसाठी, ठाकरेंवर कोणी टीका करत असले तर त्यांना ती करू देत. पण मी कधीही ठाकरे कुटुंबावर टीका करणार नाही, असे जैस्वाल यांनी ठामपणे सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इतर नेते टीका करतात ती तिकडून आरोप, टीका झाल्यानंतरची रिअॅक्शन असते, असेही जैस्वाल सांगतात. दुसरे मराठवाड्यातील नेते म्हणजे जालन्याचे माजी आमदार व मंत्री अर्जुन खोतकर. मुळात त्यांनी शिवसेना व ठाकरेंची साथ सोडली तीच ईडीच्या कारवाईचा बडगा उगारल्यामुळे. जड अंतःकरणाने त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून घेतल्याचे जाहीरपणे पत्रकारपरिषदेत सांगितले होते. हा निर्णय घेताना त्यांच्या व कुटुंबीयांच्या डोळ्यातले पाणी त्यांची अवस्था सांगणारी होती.

आता ते उपनेते म्हणून शिंदेंची शिवसेना मजबूत करण्यासाठी झटत आहेत. पण त्यांनीही दीड वर्षात कधी ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल वाईट शब्द काढले नाहीत. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर हेही सध्या शिंदेंसोबत आहेत. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल त्यांनीही अपशब्द किंवा टीका केल्याचे ऐकिवात नाही. आता हा या आमदार, नेत्यांचा ठाकरे कुटुंबाबद्दल असलेला आदर आहे, की मग भविष्यातील राजकारणाचा विचार करून घेतलेली भूमिका आहे? हे पुढील काळातच स्पष्ट होईल.

edited by sachin fulpagare

R...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Latur Loksabha Constituency : महाविकास आघाडी लातूरमध्ये आतातरी जिंकण्यासाठी लढणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com