Suraj Chavan Sarkarnama
मुंबई

Suraj Chavan: दिल्लीचा ठाकरेंना दणका; आदित्य यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक

Jui Jadhav

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची थेट चिरफाड करत व्हिडिओद्वारे पुरावेच दाखवले. या पत्रकार परिषदेची राज्यात मोठी चर्चा झाली. यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी दिल्लीने ठाकरे गटाला मोठा दणका दिला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाणांची ईडीकडून अनेकदा चौकशी करण्यात आली होती. आता चौकशी पूर्ण झाल्यानंतर चव्हाणांना ईडीने अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरज चव्हाणांच्या घरी ईडीची धाड पडली होती. त्यानंतर स्वतः ईडी कार्यलयात जाऊन ते चौकशीला सामोरे गेले होते. मात्र ईडीकडून ठाकरेंच्या अतिशय विश्वासू पदाधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरज चव्हाण यांना अटक करण्यात आल्यानंतर गुरुवारी ईडीच्या विशेष कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे. कोर्टात सुरज चव्हाण यांच्या बाजूने काय युक्तीवाद करण्यात येतो, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर सध्या धाडसत्र सुरु असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरी देखील ईडीची छापीमारी झाली होती. यानंतर आता सुरज चव्हाणांना अटक झाली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबई महापालिकेत कोरोनाच्या काळात कथित खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकणात ईडीने सुरज चव्हाण यांची चौकशी केली होती. तसेच सुरज चव्हाणांनी अनेक कंत्राटदारांना चढ्या दराने कंत्राटं मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.

सुरज चव्हाणांच्या अटकेनंतर सोमय्या काय म्हणाले ?

सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत "ईडीने केलेल्या कारवाईचे मी स्वागत करतो. खासदार राऊतांच्या मित्र परिवाराच्या खात्यातही या खिचडीचे पैसे गेले. ठाकरेंच्या नेत्यांनी ऑक्सिजन खाल्ले, रेमडेसीवीर, खिचडी खाल्ली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना याचा हिशोब द्यावाच लागणार आहे", असं किरीट सोमय्या म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT