Thackeray Group Suraj Chavan ED Inquiry : तब्बल साडे आठ तासांनंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची ईडी चौकशी संपली

ED Inquiry In BMC Covid Scam : ईडीने सूरज चव्हाण यांच्यासह इतर 15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या ठिकाणी मागील आठवड्यात छापे टाकले होते.
Suraj Chavan
Suraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर (Covid Centre) गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ईडीने जवळपास 17 तास सूरज चव्हाण यांच्या घरी चौकशी केली. त्यानंतर सोमवारी (दि.26 ) त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अखेर साडेआठ तासांनंतर चव्हाण यांची ईडी चौकशी संपली आहे.

कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण(Suraj Chavan) यांच्यासह इतर 15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या ठिकाणी मागील आठवड्यात छापे टाकले होते. दरम्यान, या कारवाईमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली होती. तसेच कोट्यवधींची कागदपत्रं हाती लागलेले होते. याचवेळी व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्येही पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे.

Suraj Chavan
Gunratna Sadavarte On State Transport Bank Victory : स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेच्या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित घोटाळ्यात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ आणि वितरक किंवा कंत्राटदार यांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता सूरज चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, तसेच ते पालिकेचा अधिकारी नसूनही त्यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये दखल का दिली याची चौकशी सध्या ईडी(ED)कडून करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्या(Covid Scam) प्रकरणी सुरज चव्हाण यांची चौकशी सुरु आहे. सुरज चव्हाण यांनी 10 कोटी किंमतीचे 4 फ्लॅट खरेदी केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याचे कागदपत्रेही ईडीच्या हाती लागले आहेत. त्याच अनुषंगाने चव्हाण यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांची कसून चौकशी सुरु आहे. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सुरज चव्हाण यांनी मध्यस्थी म्हणून भूमिका साकारली होती असा ईडीला संशय आहे.

Suraj Chavan
BRS Nagpur News : कोण कार्यक्षम आणि कोण ‘बी टीम’, हे आता महाराष्ट्राची जनताच ठरवेल !

काय आहे आरोप...?

एक विशिष्ट संस्था कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णासांठी ज्या बॉडी बॅगची आवश्यकता होती. ती इतर रुग्णालयांना 2000 रुपयांना विकण्यात आली. मात्र, याच कंपनीने पालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाला ही बॅग 6800 रुपयांनी विकली. दरम्यान, हे सर्व पालिकेच्या तत्कालीन महापौर यांच्या सूचनेनुसार हे कंत्राट देण्यात आले होते असं तपासात समजल्याचं सांगण्यात येत आहे.

तसेच कोविडच्या उपचारांसाठी ज्या दरात औषधं पालिकेला पुरवण्यात येत होती तीच औषध खुल्या बाजारात 25-30 टक्के कमी दराने विकण्यात येत होती असं देखील सांगण्यात येत आहे. तर ही बाब पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असताना देखील त्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे. तर कथित कोविड सेंटर घोटाळा हा 4000 कोटी रुपयांचा असल्याचं सागंण्यात येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com