Ravindra Chavan News : विकास म्हात्रेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी उच्चारला 'हा' एकच शब्द

Political News: निकटवर्तीय विकास म्हात्रेंना रोखू शकणार का मंत्री चव्हाण?
vikas Mahatre, ravindra chvahan
vikas Mahatre, ravindra chvahan Sarkarnama
Published on
Updated on

Political News : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रेंनी माजी नगरसेविका पत्नीसह भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. विकासकामे होत नाहीत, निधी मिळत नाही, असा आरोप विकास म्हात्रे यांनी केल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला. विकास म्हात्रे हे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे म्हात्रेंच्या राजीनाम्याने भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या काळात म्हात्रेंची समजूत काढली जाते का ? ते शिंदे गटात प्रवेश करणार, याची उत्सुकता लागली आहे.

विकास म्हात्रे हे कॅबिनेटमंत्री राजीनाम्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय होते. यासंदर्भात मंत्री चव्हाण यांना विचारले असता त्यांनी धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांची यासंदर्भातील पुढील चाल काय असेल ? अशी चर्चा रंगली आहे.

vikas Mahatre, ravindra chvahan
Udayanraje Bhosale : ...महाराष्ट्राचा पुढचा कारभार फडणवीसांना हातात घ्यावा लागणार : उदयनराजेंचं सूचक विधान

मंगळवारी सकाळी कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पुस्तक आदान-प्रदान या कार्यक्रमासाठी ठेवण्यात येणाऱ्या पुस्तकाच्या राम मंदिराचा कळस चढविला. यावेळी त्यांना भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी मंगळवारी दिलेल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी धन्यवाद, अशी प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. मात्र, विकास म्हात्रे हे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याने ते त्यांना कसे समजावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विकास म्हात्रे शिंदे गटात जाणार का ?

माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे नेते विकास म्हात्रे (Vikas Mhatre) यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी विकास म्हात्रे यांनी शिंदे गटात यावे, असा सल्ला त्यांना दिला आहे. त्यामुळे विकास म्हात्रे आता नेमके कुठे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विकास म्हात्रे यांचे राजीनामा देण्याचे हे आहे कारण....

एकीकडे विकासकामांच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या माजी स्थायी सभापती म्हात्रे यांनी विकासकामासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करीतच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी रस्त्यावरील खड्डे, पाणी यांसारखे सर्वसामान्यांना महत्त्वाचे असलेल्या मुद्यांना अधोरेखित केले आहे. काम होत नसल्याने नागरिकांना सामोरे जाणे कठीण झाले असून भाजपविरुद्ध असंतोष असल्याने त्यांनी राजीनामा दिलेल्या पत्रात सांगितले आहे.

(Edited By sachin waghmare)

R...

vikas Mahatre, ravindra chvahan
Ravindra Chavan : कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का; मंत्री चव्हाणांच्या निकटवर्तीयांनी सोडली साथ

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com