Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडे किती शिवसेना उरलीय ? भाजपने स्पष्टच सांगितलं

BJP Politics : 'थापांची बरसात खूप झाली. अब की बार भाजप तडीपार!'

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप फक्त आश्वासनांची खैरात करते, असा घणाघात करून, 'थापांची बरसात खूप झाली,अब की बार भाजप तडीपार', असा निशाणाही ठाकरेंनी केला. दरम्यान,फडणवीस यांच्यावर केलेल्या टिपण्णी भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येते. त्यास भाजपने सडेतोड उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा (Devendra Fadnavis) पाव उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून फडणवीसांना चांगलेच सुनावले. या टीकेला आता भाजपने आपल्या सोशल मीडियावरून चोख प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेसाठी तुम्ही सोनिया गांधींपुढे झुकले. आता निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंना आता कोकणची आठवण झाली. उद्धव ठाकरेंकडे आता पाव सेनाही उरलेली नाही, अशी सडकून टीका भाजपने केली.

मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंगजेबावरचे प्रेम दिसून येते. भाजपचे सुरूवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, असा घणाघातही भाजपने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेंद्र फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी हिणवले होते. त्याला उत्तर देताना भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून येते. देवेंद्र फडणवीसांवर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ते बघा. सच्चा शिवसैनिकाने तुमची साथ कधीच सोडलीय. आता तुमच्याकडे पाव सेनाही उरलेली नाही, असे सडेतोड प्रत्युत्तर देत भाजपने ठाकरेंना समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT