Ambadas Danve News : मराठा-ओबीसी वादात सरकारची भूमिका मी मारल्या सारखं करतो, तू....

Political News : मुख्यमंत्र्यांची भुजबळांच्या विधानावर नेमकी भूमिका काय आहे? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केला.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapti Sambhajinagar News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात एखादा निर्णय घेतात. त्याला सरकारमधीलच एक मंत्री विरोध करतो आणि दोन समाजामध्ये विष कालवण्यासाठी गरळ ओकतो. मग हा सगळा प्रकार त्या पक्षाचे नेते अजित पवार, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? मुख्यमंत्र्यांची भुजबळांच्या विधानावर नेमकी भूमिका काय आहे? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केला.

मी मारल्या सारखं करतो, तू रडल्या सारखं कर, असाच प्रकार सध्या राज्यात सुरू आहे. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असून पण राज्यातील जनता दुधखुळी नाही, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

Ambadas Danve News
Lok Sabha Election 2024 : जानकरांचे मिशन परभणी; महाविकास आघाडी अन् महायुतीला टेन्शन

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथे शिंदे गटाच्या शहरप्रमुखवर गोळीबार करून महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित केली.भाजप लोकशाही राजकारणात नेहमीच साधनशुचिता, कायद्याचे राज्य व देशातील नागरिकांची सुरक्षा यात प्रथम असल्याचा दावा करत असते. मग यावेळेस त्यांची ही नैतिकता कुठे गेली.

खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे काळे कारनामे व अवैध धंदे सुरू राहण्यासाठी महेश गायकवाड यांना अभय दिले जात असून तोही काही स्वच्छ चारित्र्याचा व्यक्ति नाही, असा आरोपही दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील मंत्री दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरच्या ओबीसी मेळाव्यात भुजबळ यांनी मंत्री पदाचा राजीनामा मी 16 नोव्हेंबर रोजीच दिला असल्याचा दावा केला. मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर अशा प्रकारे राज्यातील सत्ताधारी काम करत असल्याची टीकाही दानवे यांनी केली.

कायदा आणि सुव्यवस्थेचा अभिमान असल्याचे भारतीय जनता पक्ष सांगत असतो. याप्रकरणी त्यांचा गृहमंत्री असल्याने महेश गायकवाड यांच्या तक्रारीची ते दखल घेणार आहेत की नाही? असा सवालही अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

(Edited By-Sachin Waghmare)

Ambadas Danve News
Ambadas Danve : शिंदे, अजित पवार गटाने घेरले..! पण अंबादास दानवे आव्हाडांसाठी सरसावले...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com