BJP banners over Shiv Sena advertisement  Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shiv Sena: शिवसेनेच्या जाहिरातीला भाजपचे प्रत्युत्तर; वाजपेयींच्या कवितेचा आधार घेत..

BJP Banners over Shiv Sena Advertisement: या जाहिरातीनंतर भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : खासगी कंपनीच्या सर्वेक्षणाचा आधार घेत शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन दिवसापूर्वी जाहिरातीतून केला आहे. यात मुख्यमंत्री शिंदे हे फडणवीसांपेक्षा कसे सरस आहेत, सांगण्यात आले. या जाहिरातीनंतर भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

शिवसेनेच्या जाहिरातीला सडेतोड उत्तर भाजपनं दिले आहे. यावरुन मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या आधार घेऊन भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या या बॅनरची सध्या चर्चा सुरु आहे.

दोन दिवसापूर्वी शिवसेना-भाजप युतीची झळकलेली जाहिरात अनेक वृत्तपत्रांची 'हेडलाईन' झाली. या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली होती. या जाहीरातीवरुन विरोधकांना टीका करण्यासाठी आयत कोलीत मिळाल होत. त्यानंतर काल (बुधवारी) शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे.

‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली. या जाहिरातीवरून वाद झाला होता. त्यानंतर भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे.

पहिल्या जाहिरातीवर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर जाहिरातीतली चूक दुरुस्त करण्यात आली आहे. बुधवारी पुन्हा नव्यानं जाहिराती दिली आहेत. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT