Uddhav Thackeray, Amit Shah Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : भाजप नेत्यानं शिवसेनेत प्रवेश करताच 'बाजारबुणगे' म्हणत ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

Jagdish Patil

Mumbai News, 25 Sep : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (ता. 25 सप्टेंबर) त्यांच्या उपस्थितीत विदर्भात कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी आपलं लक्ष हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखण्याचं आहे.

त्यामुळे महायुतीत मतभेद न ठेवता कामाला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. शाह यांच्या याच वक्तव्याचा समाचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शाह यांचा महाराष्ट्रा बाहेरचे बाजारबुणगे असा उल्लेख केला. शिवाय ते आम्हाला खतम करायची भाषा करतात पण हिंमत असेल तर येऊन बघा कोणाला महाराष्ट्र खतम करतो, असं आव्हानही त्यांनी यावेळी शाह यांना दिलं.

मातोश्रीवरील दिनेश परदेशी यांच्या पक्षप्रवेशा दरम्यान बोलताना ठाकरे म्हणाले, सर्व शिवसैनिकांचं मातोश्रीमध्ये स्वागत आहे. मागील आठवड्यात मी आपल्या इकडं येऊन गेलो, त्यावेळी दिनेश परदेशी प्रवेश करणार होते. भाजपमधून (BJP) तुम्ही इकडं आलात, भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना तुमच्यामध्ये सुरु झालेला भेसळीचा कार्यक्रम मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विचारला.

तसंच, सध्या हिंदुत्वाच्या नावावर या लोकांनी थोतांड माजवलं आहे. माझं हिंदुत्व वेगळं आहे. कालच महाराष्ट्रा बाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करुन गेले, आता ते भाषण मी ऐकलेलं नाही. हे बाजारबुणगे आहेत त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे.

मात्र, त्यांना कल्पना नाही हा महाराष्ट्र वीरांचा आहे. आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, बाजारबुणगे असा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. उद्धव ठाकरेंना, पवारसाहेबांना खतम करा असं म्हणतो, हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो, ते दाखवून देतो, अशा शब्दात ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

विदर्भातील (Vidarbha) कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलाताना अमित शाह म्हणाले, "विदर्भात यापूर्वी भाजपने 42 जागा जिंकल्या होत्या. विदर्भ जिंकल्याशिवाय राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार कोणाचा हा किंतु-परंतु मनातून काढून टाका.

महायुतीच्या उमेदवाराला भाजपचा समजा. कारण आपले लक्ष काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखण्याचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने बुथवाईज नियोजन केले आहेत. त्याची ए.बी.सी. अशी श्रेणी केली आहे. त्या सर्व बूथवर 10 टक्के मते वाढवल्यास भाजपला कोणी पराभूत करू शकणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT