Supriya Sule Video : सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना इशारा; 'देवेंद्रजींनी तिकडून बंदूक दाखवावी आम्ही...'

Supriya Sule on Devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी आरोपीच्या एन्काऊंटरवरून आपापल्या नेत्यांना श्रेय देण्यासाठी सोशल मीडिया पोस्टरच्या माध्यमातून स्पर्धा सुरू केली आहे.
Supriya Sule on Devendra fadnavis
Supriya Sule on Devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा सोमवारी सायंकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर आता राजकारण सुरू झाला असून विरोधक आणि सत्ताधारी आपअपल्या परीने या घटनेची बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी आरोपीच्या एन्काऊंटरवरून आपापल्या नेत्यांना श्रेय देण्यासाठी सोशल मीडिया पोस्टरच्या माध्यमातून स्पर्धा सुरू केली आहे.

भाजपाच्या समर्थकांकडून सोशल मीडिया वर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत पोस्टर व्हायरल करण्यात येत आहेत. या पोस्टरमध्ये 'लाडक्या बहिणीसाठी तो अपराध्यांना तोडतो ही आणि ठोकतो ही.. सिंघम देवा भाऊ' अशा मजकुरासह देवेंद्र फडणवीस यांचा बंदूक घेतलेला फोटो वापरण्यात आला आहे.

Supriya Sule on Devendra fadnavis
Akshay Shinde Encounter Case Update: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर 'फेक'? वडिलांनी उचललं मोठं पाऊल

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे देखील समर्थक मागे राहिलेले नाहीत. चिमुकल्यांना न्याय देणारा असा हा धर्मवीर म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर व्हायरल केले आहे. एकीकडे या घटनेबाबत श्रेयासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असताना दुसरीकडे या पोस्टरवरून विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पोस्टरवरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Supriya Sule on Devendra fadnavis
Akshay Shinde Postmortem Report : ...अखेर अक्षय शिंदेचा 'पोस्टमार्टम रिपोर्ट' आला समोर; मृत्यूचं नेमकं कारणही उघड!

पुणे दौऱ्यावरती असता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे व्हायरल होत असलेल्या पोस्टर बाबत बोलताना सुळे म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस हे एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. जे मुल ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय... मिर्जापुर टीव्ही सिरीयलमध्ये अशा गोष्टी चालतात.. हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे... हा देश बंदुकीने नाही चालणार तर संविधानाने चालणार... देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावे आम्ही संविधान दाखवू...असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com