Manoj Jarange patil : मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागील नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते.
अखेर आज (बुधवारी ) कोर्टाच्या निर्देशानसुार आपण उपचार घेत असून सलाईन लाऊन उपोषण करणे योग्य नाही, असे म्हणत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उपोषण स्थगित करणार असल्याचे जाहीर केले.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा करण्याआधी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. फडणवीस साहेब हाताने सत्ता घालवू नका. मराठा समाज वाट पाहतोय. नाहीतर आरक्षणासाठी आम्हाला सत्तेत बसावे लागेल, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा करताच तेथे उपस्थित मराठा बांधवांना एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत जल्लोष केला.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, 'सगेसोयरे'चा प्रश्न सोडवावा, हैद्राबाद सातारा मुंबई गॅझेट करणे अशा मागण्यांसाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषण सुरू केले होते.
उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून मराठा समाज बांधवांकडून मागणी करण्यात येत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.