Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

BJP Politics Video : एकनाथ शिंदेंची अडचण भाजप वाढवणार? 'या' पदावर करणार दावा

BJP Politics Eknath Shinde Thane Guardian Minister :एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे यांनी लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठींबा केला नाही.

Roshan More

BJP Politics : महायुतीतील खाते वाटपानंतर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. रायगड, पुणे, सातारा, संभाजीनगर या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर तीनही पक्षाच्या नेत्यांकडून दावा करण्यात येत आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या ठाण्यावर भाजपने दावा केला असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी ठाण्याचे पालकमंत्रिपद मागण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त तिथे त्या पक्षाचा पालकमंत्री असे सुत्र देखील निश्चित केले जात असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे यांनी लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठींबा केला नाही. अजित पवार यांच्याकडून निकाल जाहीर होताच फडणवीस यांच्या नावाला पाठींबा देण्यात आला होता. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गृहमंत्रिपदावर अडून बसले होते.

भाजपकडून एकनाथ शिंदे यांची गृहमंत्रिपदाची मागणी देखील पूर्ण करण्यात आली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पद आपल्याकडे ठेवले. त्यामुळे दोन पावले मागे गेलेले एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याचेही पालकमंत्रिपद मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठाणेच्या पालकमंत्रिपदावर भाजपकडून दावा केला जातो आहे.

ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून गणेश नाईक यांना विचारले असता ते म्हणाले,मी मंत्री बनण्याविषयी इच्छा व्यक्त केली होती? खाते कोणते मिळावे या विषयी इच्छा व्यक्त केली होती? असे म्हणत आपल्याला न मागता मिळाले, असे संकेत दिले. तसेच महायुतीचे तीनही नेते मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील. एक जानेवारीनंतरच यावर निर्णय होतील, असे त्यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT