Atishi Marlena : 24 तासांचा अल्टिमेटम, नाहीतर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढू

Atishi Marlena On Congress : सीएम आतिशी यांनी काँग्रेसला त्यांच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या नेत्यांवर कारवाई न झाल्यास काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्यासाठी इतर पक्षांशी चर्चा करेल
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्ली निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीत मोठी फूट पडताना दिसत आहे. आम आदमी पार्टीने कॉग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. तसेच केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत कॉग्रेसला उत्तर दिले आहे.

या पत्रकार परिषदेत सीएम आतिशी यांनी काँग्रेसला त्यांच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच दिलेल्या वेळेत या नेत्यांवर कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्यासाठी इतर पक्षांशी चर्चा करेल, असे आतिशी यांनी म्हटले आहे.

 या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आतिशी म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपशी हातमिळवणी करत असल्याचे दिसत आहे. जर तसे नसेल आणि आगामी निवडणुकीत भाजपला रोखायचे असेल तर कॉग्रेसने अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करावी. जर काँग्रेस पक्षाने अशा लोकांवर कारवाई केली नाही तर यापुढे आम्हाला काँग्रेस पक्षाशी युती ठेवायची नाही. असं आतिशी म्हणल्या.

Rahul Gandhi
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या हत्येविरोधातील एल्गारात शरद पवारांनंतर हा नेता होणार सहभागी

पुढे आतिशी म्हणाल्या , भाजप काँग्रेस उमेदवारांना निधी देत ​​असल्याचे दिसते. भाजप नेते संदीप दीक्षित आणि फरहाद सूरी यांना निधी देत ​​असल्याची माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे.

Rahul Gandhi
Sonu Sood : "सोनू सूद म्हणतो , 'मला इंटरेस्ट नव्हता म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली'"  

यावरून आम आदमी पार्टीचा पराभव करून भाजपला जिंकण्यासाठी काँग्रेसने संगनमत केल्याचे स्पष्ट होते. अजय माकन हे भाजपचे लोक जे करायला सांगतात तेच करतात.असा आरोप देखील आतिशी यांनी केला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com