Raj Thackeray 1 Sarkarnama
मुंबई

BJP Politics : अमित ठाकरे आमदार होणार? भाजप राज्यपाल कोट्यातून संधी देणार? मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युती?

BJP CM Devendra Fadnavis MNS President Raj Thackeray Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भाजप-मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले. या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यापार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

भाजप-मनसेच्या (MNS) युतीची माहिती समोर येत असतानाच, त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे. भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व आले आहे.

दरेकरांचा कालचा सल्ला अन् आज भेट...

राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेताना विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण केले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले होते. त्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी काल उत्तर देत सल्ला दिला. आणि आज देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले. त्यामुळे राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ होणार असे हे संकेत आहे.

फडणवीस-ठाकरेंमध्ये तासभर चर्चा

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या एक तासांपासून चर्चा सुरू आहे. फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित होते. फडणवीस यांच्याबरोबर मोहित कंबोज आहेत. फडणवीस अन् ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे माहिती आहे.

अमित ठाकरेंचा आमदारकीच्या निवडणुकीत पराभव

अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची चर्चा आहे. मनसे लोकसभेला नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर विधानसभा स्वबळावर लढवली होती. यात अमित ठाकरे यांचा माहीम मतदारसंघातून पराभव झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे महेश सावंत इथं विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT