Congress leader

 

sarkarnama

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते; भाजपचा आरोप

शिवरायांच्या सिंहासनापेक्षा लाचारीने मिळविलेल्या सत्तेची खुर्ची शिवसेनेला (Shiv Sena) अधिक प्रिय वाटत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरुन आता भाजपने (BJP) काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.

त्या घटनेचा उल्लेख छोटी घटना असा केल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्यावरही टीका झाली. या प्रकारावरून भाजपने एक धक्कादायक दावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा तरुण हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच या तरुणाचे काँग्रेसचे कर्नाटकमधील बडे नेते डी. के. शिवकुमार यांच्यासह इतर नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यानंतर आता भाजपने आक्रमक भूमिका घेत, शिवसेनेवर टीका केली आहे.

भाजपचे नेते सी. टी. रवी यांनी ट्वट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मी निषेध करतो. कर्नाटकमधील राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी हे कृत्य घडवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने शिवरायांचा अवमान करणाऱ्या या कृत्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना जाब विचारतील का, असा सवालही रवी यांनी केला आहे.

महाराष्ट्र भाजपनेही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात काँग्रेसचा हात असेल व शिवसेना त्याला मूक संमती देत असेल, तर शिवरायांच्या सिंहासनापेक्षा लाचारीने मिळविलेल्या सत्तेची खुर्ची शिवसेनेला अधिक प्रिय वाटत आहे. हा शिवसेनेच्या लाचारीचा सर्वोच्च बिंदू आहे!, अशी टिका शिवसेनेवर भाजपने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT