शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय

बंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.
Jayant Patil, NCP
Jayant Patil, NCPSarkarnama

मुंबई : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना (Shivaji Maharaj statue desecrated in Bengaluru) झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेध करण्यात आला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोठा निर्णय घेतला असून याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

पाटील यांनी आज (ता. 19) महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या सर्व पुतळ्यांना दुधाचा अभिषेक करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यानुसार आज राज्यात सर्वत्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अभिषेक घातला जाणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील.

Jayant Patil, NCP
भाजपचे पुढारी नेभळट...अंगाशी खेटू नका, गाठ आमच्याशी आहे!

पाटील यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील.

दरम्यान, या घटनेवर विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच, असं फडणवीस म्हणाले आहेत.

ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhonsle) यांनी ट्विटव्दारे कर्नाटक प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तत्काळ कठोर कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com