Hitendra Thakur | Sneha Pandit Sarkarnama
मुंबई

Vasai Virar Election Results : सुसाट सुटलेल्या भाजपला पराभवाचा धक्का, ठाकूरांनी विजयी गुलाल उधाळला; वसई-विरार महापालिका सत्ता मिळवली

Hitendra Thakur Strategy Vasai–Virar : 26 महापालिकांमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपचा मोठा झटका बसला आहे. वसई-विरार, परभणीमध्ये त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे.

Roshan More

Vasai–Virar Result : परभणीमध्ये महापालिकांमध्ये मोठा धक्का बसला आहे. विधानसभा आणि लोकसभेला पराभवाचा सामना करावा लागलेल्या हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीने वसई-विरार महापालिकेत दमदार कामगिरी केली.

115 जागा असलेल्या या महापालिकेत तब्बल 66 जागांवर बहुजन विकास आघाडीवर आहे. तर, 45 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. त्यामुळे या महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचे चित्र आहे.

तर, परभणीत देखील ठाकरेंची शिवेसना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 23 जागांवर ते आघाडीवर आहेत. तर, भाजपला 13 जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेसला 11 जागा आहेत. 65 जागा असलेल्या या महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील.

भाजपची कामगिरी सुधारली

वसई-विरारमध्ये लोकसभा आणि विधानसभेला यश मिळाल्यानंतर महापालिकेत देखील त्यांना मिळेल असा अंदाज होता. मात्र, ते सत्तेपासून लांब राहिले आहेत. मात्र, या महापालिकेत भाजप अस्तित्वात देखील नव्हती. बहुजन विकास आघाडीची इथे एक हाती सत्ता होती. त्याला आव्हान देत तब्बल 48 जागा त्यांना मिळणार आहे. त्यामुळे सत्ता नसली विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT