Ajiv Patil Vasai–Virar Mayor  sarkarnama
मुंबई

BJP Defeated : भाजपचा सपाटून पराभव, महापौरपदी अजीव पाटील; उपमहापौरपदी लोपीस; ठाकूरांचे सोशल इंजिनिअरिंग!

Ajiv Patil Vasai–Virar Mayor BVA : महापौर निवडणुकीत भाजपने महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार दिले होते. मात्र, त्यांना परभवाचा सामना करावा लागला. अजीव पाटील हे महापौर म्हणून विजयी झाले.

संदीप पंडित

Vasai–Virar News : वसई विरार ममहानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी झाली आणि त्यात बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नगरसेवक अजीव पाटील यांनी महापौर पदी निवड करण्यात आली. त्यांनी भाजपच्या अॅड दर्शना त्रिपाठी यांचा 71 विरुद्ध 44 मतांनी पराभव केला. तर मार्शल लोपीस यांनी भाजपच्या नारायण मांजरेकर यांचा पराभव करून ते उपमहापौर पदी विजय मिळवला.अजीव पाटील हे पालिकेचे सातवे महापौर ठरले आहेत.

निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली.पीठासीन अधिकारी यांना पालिका आयुक्त मनोजकुमार सुरवंशी यांनी काम पाहिले.सभागृहाचे कामकाज नगर सचिव विश्वनाथ तळेकर यांनी पाहिले.निवडणूक होत असलेल्या सभागृहाच्या बाहेर आणि मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सभागृहचे कामकाज सुरू झाल्या नंतर उमेदवार 8 अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली होती.यामध्ये बहुजन विकास आघाडी तर्फे निषाद चोरघे आणि प्रफुल साने यांनी अर्ज मागे घेतल्याने बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि भाजपच्या ऍड दर्शना त्रिपाठी यांच्यात सरळ लढत होऊन अजीव पाटील हे 71 विरुद्ध 44 मतांनी निवडून आले.

या निवडीनंतर भाजपकडून जय श्री रामचा जयघोष करण्यात आला तर त्याला बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जय द्वारकाधीश घोषणेने प्रत्युत्तर दिले. उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजनच्या मार्शल लोपीस यांनी नारायण मांजरेकर पराभव केला.सभागृहात निवडणूक सुरू असताना सभागृहाच्या बाहेर, पालिकेचे पहिले महापौर आणि अजीव पाटील यांचे मोठे बंधू राजीव पाटील, माजी महापौर आणि जेष्ठ नेते नारायण मानकर, माजी उपमहापौर उमेश नाईक लॉबी मध्ये बसून होते.

पीठासीन अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी महापौर उपमहापौरांची निवड जाहीर केल्या नंतर सभागृहात माजी आमदार आणि बहुजन विकास आधाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर,माजी आमदार क्षितिज ठाकूर,माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पोलिस छावणीच स्वरूप

महापौर निवडणूक होत असलेल्या ठिकाणी 12 पोलीस अधिकारी आणि 53 पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.महापौर निवडणुकीसाठी प्रथमच एवढा पोलीस बंदोबस्त पहिल्यादा दिसून आला. अजीव पाटील हे पाटील कुटुंबातील दुसरे महापौर ठरले आहेत.यापूर्वी त्यांचे मोठे बंधू राजीव पाटील हे महानगरपालिका स्थापने नंतरचे पहिले महापौर झाले होते.अजीव पाटील हे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आत्ये भाऊ आहेत.

विकासाला चालन देणार

महापौर पदी निवड झाल्यानंतर अजीव पाटील म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन वसई विरारच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे.गेल्या पाच वर्षा पासून येथील रखडलेल्या विकासाच्या योजनांना आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही चालना देणार आहोत

...शिट्टीची ताकद समजेल

गुप्त मतदान झाले असते तर शिट्टीची ताकद समजली असती.परंतु अजून वेळ गेली नाही येणाऱ्या काळात ऑपरेशन शिट्टी तुम्हाला बघायला मिळेल.अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेले नगरसेवक वसई विरारच्या विकासासाठी प्रयत्न करतील,असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT