Girish Mahajan : "अजितदादांचा अपघात हा 'ऑपरेशन लोटस'चा भाग म्हणणाऱ्या राऊतांसारख्या बोलबच्चन नेत्यांमुळे ठाकरेंची शिवसेना संपण्याचा मार्गावर..."

Sanjay Raut Statement on Ajit Pawar Death: खासदार राऊत सातत्याने धाडसी विधाने करीत असतात. त्यांच्या या विधानांमुळेच ठाकरेंच्या शिवसेनेची वातहात झाली आहे. हा पक्ष कुठे पोहोचला आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असं म्हणत महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला. संजय राऊत यांच्यासारख्या बोलबच्चन नेत्यांमुळे शिवसेनेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape Case
Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape CaseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 04 Feb : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या विधानाने महायुतीला चांगलाच शॉक बसला आहे. त्यामुळे संतापलेल्या नेत्यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेलाच सल्ला दिला.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाता विषयी वेगळाच दावा केला होता. अजित पवारांचा अपघात हा 'ऑपरेशन लोटस'चा भाग आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे पवार यांच्या हाती लागले होते, असे राऊत म्हणाले.

खासदार राऊतांच्या आरोपाने महायुतीचे नेते चांगले संतापले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन पुढे आले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्या मानसिक आरोग्य विषयी चिमटा काढला आहे. राऊत यांची मानसिक परिस्थिती बरोबर नाही. त्यामुळे त्यांना गांभिर्याने घेऊ नये असे ते म्हणाले.

Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape Case
Ashok Chavan : भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षाने चव्हाणांचे पंख छाटले, 'आवाज त्यांचा असला तरी महापौर कोण हे...'

खासदार राऊत सातत्याने धाडसी विधाने करीत असतात. त्यांच्या या विधानांमुळेच ठाकरेंच्या शिवसेनेची वातहात झाली आहे. हा पक्ष कुठे पोहोचला आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असं म्हणत महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला. संजय राऊत यांच्यासारख्या बोलबच्चन नेत्यांमुळे शिवसेनेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिवसेना आता संपण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे ठाकरेंनी संजय राऊत यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असं महाजन म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर त्याचे राजकीय पडसाद राज्यात उमटले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणावरून आरोप, प्रत्यारोप होत आहे. त्यात शिवसेनेचे राऊत यांनी केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape Case
TET EXAM : राज्य सरकारचा मोठा निर्णय! TET देणाऱ्या शिक्षकांना सूट, नेमकं कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट राऊत यांच्या मानसिक स्थितीबाबतच प्रश्न उपस्थित केला. त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन तपासले पाहिजे, अशी टीका तटकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच सल्ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com