Ganpat Gaikwad and Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Kalyan News: कल्याणमध्ये पुन्हा भाजपच्या गणपत गायकवाड आणि शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यातला संघर्ष पेटला

Ganpat Gaikwad On Mahesh Gaikwad : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहे.

Deepak Kulkarni

Kalyan Dombivali News : कल्याणमध्ये भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. या प्रकरणात गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबारानं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. पण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजप नेते गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहे. कल्याणमध्ये आता गायकवाड गट पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे. कल्याणमधील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील वादाची ठिणगी पुन्हा एकदा पडली आहे. पण आता या वादात शासकीय अधिकार्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची सरकारी मदत जाहीर झाली होती.या सरकारी मदतीच्या वाटपावरुन गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कल्याण पूर्वमधील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. याच मदतीचे धनादेशाचे वाटप माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत कल्याण (पूर्व) मतदारसंघातील मतदारांनी गायकवाड कुटुंबाला आपला पाठिंबा पुन्हा एकदा दर्शविला आणि तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी निर्णायक विजय मिळवून दिला. सुलभा यांनी त्यांच्या पतीचे दीर्घकालीन प्रतिस्पर्धी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांचा 26,408 मतांनी पराभव केला.

याच भाजप आमदार आणि गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात कल्याण पूर्वमधील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना सरकारी 5 लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या वाटपप्रसंगी महसूल अधिकारी उपस्थित होते.यावरुन कल्याण पूर्वमधील राजकारण तापले आहे.

महेश गायकवाड यांचा आरोप काय?

शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर सरकारी रक्कम देऊन स्वतःच्या झोळीत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

गायकवाड म्हणाले,कल्याण पूर्वमध्ये यापूर्वी अनेक प्रकारच्या दुर्घटना घडल्या. त्या दुर्घटनेमधील बाधित लोकांना कधी दहा रुपयांचा निधी त्या लोकांनी दिला नाही.मात्र, आता सरकारचा निधी माजी आमदाराच्या वाढदिवशी दिला गेला.या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तहसीलदार व संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT