Pune Politics: प्लॅन ठरला होता, मात्र फिस्कटला! पुण्यात लवकरच 100 जणांचा 'या' पक्षात होणार प्रवेश; विरोधकांसह महायुतीलाही धक्का?

Pune Political News : सध्या पुण्यातील भाजपमधील बहुतांश स्थानिक नेते आणि इच्छुक हे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत, जर युतीचा पर्याय फसला, तर शिवसेनेला (शिंदे गट) स्वतंत्र ताकदीवर निवडणूक लढवावी लागेल.
Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Mahayuti Politics Local Body Elections 2025Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाची नांदी पाहायला मिळत आहे. सध्या पक्ष प्रवेश करणाऱ्यांचा ओढा भाजपकडे मोठ्या असल्याचा पाहायला मिळत आहे. आज देखील नाशिक मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाला.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घडवून आणले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यातून देखील मोठा जम्बो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला जाणार असल्याचं समोर आला आहे.

पुढील काळात पुणे (Pune) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुण्यातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडून आणण्यात येणार आहेत. पुढील काही दिवसांत सुमारे 100 नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत दाखल होणार असून, यामध्ये महायुती व महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक, तसेच गणेश मंडळ कार्यकर्ते आणि मागील महापालिकेची निवडणूक लढवलेले मात्र पराभूत झालेल्या उमेदवारांचा यांचा समावेश आहे.

अपघाताच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पुढे ढकलला ?

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा रविवारी (दोन दिवसांपूर्वी) पार पडणार होता. मात्र, मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे, तसेच केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Dhananjay Mahadik: कोल्हापूर महापालिकेत ताराराणी आघाडीला मोठा धक्का; धनंजय महाडिकांनी दिले संकेत

पुण्यात शिवसेनेची ताकद मर्यादित

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुणे शहरात शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकद फारशी वाढलेली नव्हती. पूर्वीच्या १० नगरसेवकांपैकी फक्त एक नगरसेवकच शिंदे सोबत गेला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्या प्रमाणात पुण्यामध्ये शिवसेना वाढली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आपली संघटनात्मक ताकद वाढवणे हेच शिवसेने चे प्राथमिक लक्ष्य असल्याचे दिसून येत आहे.

धंगेकरांकडे महत्त्वाची जबाबदारी

पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षात घेऊन पुणे महानगर प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. धंगेकर देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले असून, त्यांच्या प्रयत्नातूनच हा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडून येणार आहे, अशी माहिती आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Sharad Pawar News : मी 10 दिवसांसाठी इंग्लंडला गेलो अन् इकडं चमत्कार झाला..! शरद पवारांनी सांगितला सोडून जाणाऱ्यांचा इतिहास

स्वबळाचा पर्यायही शक्य

सध्या पुण्यातील भाजपमधील बहुतांश स्थानिक नेते आणि इच्छुक हे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत, जर युतीचा पर्याय फसला, तर शिवसेनेला (शिंदे गट) स्वतंत्र ताकदीवर निवडणूक लढवावी लागेल. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पक्षसंघटन मजबूत करणे आणि नव्या चेहऱ्यांना सामावून नियोजन करण्यात आला आहे.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडून आणणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत असलं तरी नेमके पक्षप्रवेशांमध्ये कोणते मोठे चेहरे असणार याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नेमके कोणते चेहरे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत आणि त्यांच्या जाण्याने खरंच इतर पक्षांना फटका बसणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com