Manoj Jarange, Nitesh Rane  Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane - Manoj Jarange Patil : " माझी किंमत भाजपला माहितीय, पण तुमची..."; राणेंचा जरांगे पाटलांना खोचक सल्ला

Deepak Kulkarni

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषण करतानाच सरकारवर टीकेची तोफ डागणं सुरूच ठेवलं आहे. त्यात जरांगे पाटलांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीसच अधिक असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यांनी मंगळवारीही फडणवीसांवर हल्लाबोल करताना रंगीबेरंगी लोकांना भाजपत घेऊन त्यांनी पक्ष संपवला असल्याची खोचक टीका केली होती. याच टीकेनंतर भाजप नेते, आमदार नीतेश राणेंनी आणि जरांगे पाटलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.

भाजप नेते नीतेश राणे (Nitesh Rane ) यांनी मीडियाशी संवाद साधताना आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, माझी किंमत भाजपला माहिती आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल, तर राजकीय बोलायचं बंद करा. हा माझा मैत्रीचा सल्ला असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले आहे.

राणे म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) कालपासून राजकीय भाषा सुरू केली आहे. 307 लावले तर आम्ही बघून घेऊ असे म्हणण्यासाठी त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय, त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावू नये.

"...तर त्यांना शिवरायांचे मावळे म्हणू नये!"

जरांगे पाटील यांनी मी आश्वासन देतो, जे निरपराध आहेत त्यांनी घाबरू नये, पण कोणीही हिंसेचं समर्थन करू नये, जाळपोळ करत असेल तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये. कोणावर चुकीची कारवाई होत असेल, तर आम्ही त्यांना मदत करू, असे आश्वासनही आमदार नीतेश राणेंनी जरांगे पाटलांना दिले आहे. (Maratha Reservation)

जरांगे पाटलांचं राणेंना टोला...

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याचवेळी त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, जरांगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आता भाजप आमदार नीतेश राणे यांच्यात तू-तू मै-मै झाले आहे. याचवेळी नीतेश राणेंनी केलेल्या टीकेला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देताना ते फोनवर फार गोड बोलतात, असा टोलाही लगावला आहे.

ही माणसं ठाकरे-पवारांची...

मराठा आरक्षणासाठी ज्या-ज्या आमदारांची घरं, गाड्या फोडल्या गेल्या आहेत. ते फोडणारे कोणीही मराठा समाजाचे नसल्याचेही त्यांनी सांगितले. ही माणसं ठाकरे-पवारांची असल्याचे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केला आहे. प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत, याचं उत्तर विनायक राऊत यांनी द्यावं, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT