मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेचा (Shivsena) भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मुंबई भाजपने (BJP) पोलखोल मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेतील रथाची मोडतोड करण्यात आली होती. यामागील आरोपींना पकडावे, यासाठी भाजपने आज मोेर्चा काढला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, तुम्ही 5 वर्षांत मुंबईकरांची फसवणूक केली असून, त्याचा हिशेब घ्यावा. गेल्या 25 वर्षांत आणि विशेषत: मागच्या 5 वर्षांत तुम्ही मुंबईकरांच्या खिशातून घेतलेल्या पैशाचा अपव्यय केला. दगडफेक करणाऱ्यांना एकचा सांगतो की तारीख अन् वेळ तुम्ही ठरवा आणि दोघं मिळून दगडफेकीचं अभियान करू. नामर्दासारखं वागू नका. पोलिसांना या नामर्दांवर योग्य कारवाई करावी. आम्हाला मुंबई पोलिसांचं कर्तृत्व बघायचं आहे.
या दगडफेकीचं उत्तर आम्ही तसंच दिलं तर ठाकरे सरकार पुढील परिस्थितीला जबाबदार असेल. भाजपचं पोलखोल आणि शिवसेनेचा डब्बागोल अशी अवस्था आहे. भाजपच्या रथाची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी. आम्ही कुणाचंही नाव घेत नाही पण हा प्रकार करणारी संघटना पळपुटी आहे. पोलिसांनी या कटामागील सूत्रधार शोधून काढावा. पोलिसांनी आरोपींनी पकडल्यानंतर पोलीस त्यांना शिक्षा देतील पण त्यांना मुबंईतून हद्दपार करावं, असेही शेलार यांनी सांगितलं
पोलखोल रथयात्रेवरील हल्ल्याबाबत प्रवीण दरेकरांनी म्हटलं होतं की, आम्ही पोलिसांना इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत आता एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यातही घेण्यात आलं आहे. युवा सेनेचा एक पदाधिकारी सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलीस त्याची खातरजमा करतील. मुंबई महापालिकेची पोलखोल आम्ही सातत्याने करत आहोत. यातून मागील 25 वर्षांचा काळा इतिहास समोर येईल म्हणून गाडीची मोडतोड करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.