उच्च न्यायालयाचं संरक्षण मिळताच नील सोमय्या प्रकटले अन् म्हणाले, मी बाहेर गेलो होतो!

आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांना अडचणीत आले आहेत.
Kirit Somaiya and Neil Somaiya
Kirit Somaiya and Neil Somaiya Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे काही दिवसांसाठी नॉट रिचेबल असलेले सोमय्या जामीन मिळताच मुंबईत अवतरले आहेत. यानंतर माध्यमांसमोर येत नील सोमय्यांनी आपली बाजू मांडली आहे. (Neil Somaiya Latest News)

नील सोमय्या म्हणाले की, बऱ्याच वेळा कामानिमित्त बाहेर जावं लागतं. त्यामुळं मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो. माझ्यावर पोलिसांचा कुठलाही दबाव नाही. मी तुमच्या समोर उभा आहे. आम्हाला कुणीही जोड्याने मारत नाही. उच्च न्यायालयानं मला आणि किरीटजींनी अटकेपासून संरक्षण दिलं आहे. याचा अर्थ हाच की या केसमध्ये काही दम नाही. किरीट आणि नील सोमय्या हे भ्रष्टाचार करतात, असा लोकांचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Kirit Somaiya and Neil Somaiya
संजय राठोडांचे कारनामे बघून मुख्यमंत्री ठाकरेही झाले चकित!

मोठमोठी वक्तव्ये करणाऱ्या लोकांकडून 57 कोटींचा नव्हे तर एका दमडीचाही हिशेब नाही. त्यांना आता 28 एप्रिलला न्यायालयात सांगावं लागेल की 57 कोटींचा आकडा कुठून आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीला मी 25 ते 28 एप्रिलदरम्यान सामोरा जाणार आहे. आयएनएस विक्रांतसाठी कार्यक्रम झाला त्यावेळी 2013 मध्ये मी 22 वर्षांचा कार्यकर्ता होतो. आम्ही प्रतिकात्मक मोहीम हाती घेऊन चर्चगेटला पैसे गोळा केले. लोकांनी त्यावेळी 10, 20, 50 आणि 100 रुपये दिले होते, असेही त्यांनी सांगितले.

Kirit Somaiya and Neil Somaiya
शिवसेना नेत्याशी पंगा महागात! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपूर्व बदली

या प्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये तुर्भे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नंतर सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com