Sharad Pawar, uddhav thackeray  Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : 'पवारसाहेबांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही', 'मविआ'च्या आंदोलनावर भाजप नेत्याचा निशाणा

Ashish Shelar Sharad Pawar Uddhav Thackeray protest badlapur case : 'पवार साहेबांना उत्तर विचारण्याचा अधिकार आहे का? ते स्वतः मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांडात गोळ्या झाडण्यात आल्या. आता प्रश्न तुम्ही विचारताय, असा टोला आशिष शेलारींनी लगावला.

Roshan More

Ashish Shelar News : महाविकास आघाडीने बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने बंदला विरोध केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आज (शनिवारी) बंद न पाळता तोंडला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यामध्ये शरद पवार, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी आंदोलन केले.

'पवार साहेब तुम्ही आणि तुमच्या सोबतची मंडळी महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढा संधीसाधूपणा तुमच्याकडून अपेक्षित नाही', अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

'पवार साहेबांना उत्तर विचारण्याचा अधिकार आहे का? ते स्वतः मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांडात गोळ्या झाडण्यात आल्या. आता प्रश्न तुम्ही विचारताय. आता तुम्हाला नागपूर मधून आरसा पाठवणार आहोत. आरशात स्वतःला बघा मग दुसऱ्याला प्रश्न विचारा', असा टोला शेलार यांनी लगावला.

'आरोपीला लवकर शिक्षा व्हावी ही महाराष्ट्राची भावना आहे. सरकार त्या दृष्टीने काम करत आहे. यात काही लोक संधी साधूपना करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते संधी साधूपणना करत आहेत. अशा लोकांना भर चौकात महाराष्ट्र प्रश्न विचारत आहे. न्यायालयाचा आपमान करणारी ही लोकं आहेत', अशी टीका देखील शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली.

मतांसाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर

मुंबईत आंदोलन करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर देखील आशिष शेलार यांनी जहरी टीका केली.उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर यावं लागलं. दोन चिमुकलींसाठी आले असते तर मान्य केलं असत. मतांचं वाडगा घेऊन उद्धव ठाकरेंना रस्त्यावर यावं लागलं आहे. माझ्या मागे उभे राहा असं आता म्हणत आहेत, असा टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT