Satej Patil News : कोल्हापूरकरांनी लोकसभेतच जोडा दाखवलाय; मुख्यमंत्र्यांना सतेज पाटलांनी डिवचले

Political News : 'जोडा दाखवा' म्हणणाऱ्या लोकांना कोल्हापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत चांगलाच जोडा दाखविला आहे, अशा शब्दांत पलटवार करत बदलापूर घटनेचा सतेज पाटलांनी निषेध केला.
 Eknath Shinde, Satej Patil
Eknath Shinde, Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : दोन दिवसापूर्वी महायुतीचा मेळावा तपोवन मैदान येथे पार पडला. या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मानार्थ मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला होता.

लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापुरी ‘जोडा दाखवा’ असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याला काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रत्यूत्तर दिले. 'जोडा दाखवा' म्हणणाऱ्या लोकांना कोल्हापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत चांगलाच जोडा दाखविला आहे, अशा शब्दांत पलटवार करत बदलापूर घटनेचा त्यांनी निषेध केला.

बदलापूर प्रकरणात आरोपीला वाचविण्याची भूमिका घेणारे महायुतीचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. मुख्यमंत्र्यांची अशी भाषा कोल्हापुरात चालत नाही. तर बंधुभावाची भाषा चालते. ज्यावेळी दाखवायचे त्यावेळी येथील जनता मतांच्या माध्यमातून भावना व्यक्त करते. कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोल्हापूर येथील लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याप्रसंगी बोलताना त्यांनी उपस्थित महिलांना उद्देशून लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापुरी ‘जोडा दाखवा’ असे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान काँग्रेस नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यामुळेच लगेचच त्यांच्याकडून टीका करण्यात आली.

 Eknath Shinde, Satej Patil
Badlapur School Crime Case : बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने उचलली कठोर पावले; मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित

के. पी. समर्थकांनी घेतली पाटील यांची भेट

राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना उमेदवारीची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत माजी आमदार के. पी. पाटील यांची अडचण झाली आहे. तर ए. वाय. पाटील यांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी के. पी. पाटील समर्थकांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. मात्र जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

 Eknath Shinde, Satej Patil
Samarjeetsinh Ghatge : ...त्यांचा आणि माझा संबंध संपला! समरजित घाटगे यांच्याकडून एक घाव दोन तुकडे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com