Chandrakant Patil-Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

अमित शहा म्हणाले म्हणून मुंबईत शिवसेनेचा महापौर, अन्यथा...

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कडाडून टीका केली आहे. मुंबई येथे आज (ता.) पत्रकार परिषदेत बोलतांना पाटलांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. दरम्यान शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत शिवसेनाच दादा या वक्तव्यावर पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा होऊ द्या हे केवळ त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) म्हणाले म्हणूनच शिवसेनेचा महापौर झाला, अन्यथा त्यांना त्यावेळीच दादा कोण ते कळाले असते, अशी टीका पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी महापौर पदावरून केलेल्या दाव्यावरून मात्र आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पाटील म्हणाले की, मुंबईत आमचीच चालती आहे असे शिवसेनेकडून बोलले जाते. मुंबई आमचीच अशी सत्तेत असणाऱ्यांची भाषा असते का? मुंबईचा दादा हा शिवसेना आहे हा शिवसेनेचा गैरसमज आहे. शिवसेनेचे नगरसेवक 84 तर भाजपचे 82 होते. केवळ अमितभाईंने म्हटले की, मुंबईचा महापौर शिवसेनेचा होऊद्या म्हणून ते वाचले, नाही तर त्याचवेळी त्यांना कळाले असते की मुंबईचा दादा कोण आहे. अश्या शब्दात पाटलांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

पुण्यात किरीट सोमय्यावर झालेल्या हल्याप्रकरणी बोलतांना पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाटील याप्रकरणी म्हणाले की. सोमय्या यांच्यावर हल्ला करणे शिवसेनेला महागात पडणार आहे. याप्रकरणी केंद्राच्या सुरक्षा प्रमुखांनी पुणे पोलीस आयुक्तांकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणात पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचीही चौकशी होणार आहे. या प्रकरणाला भाजप सहजासहजी खपवून घेणार नाही. सुटीचा दिवस असूनही पालिकेच्या आत १०० लोक कसे घुसले होते? तसेच, केंद्रीय पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांवर दबाव असल्यासारखी त्यांनी कलमे लावली आहे. त्यामुळे केंद्रातील सुरक्षा प्रमुखांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना त्याची वेगळी तक्रार दाखल करायला सांगितली आहे. अन्यथा केंद्रातील सुरक्षाप्रमुख न्यायालयात जातील, असा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, पाटील यांनी मुंबई निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री पदाप्रमाणे मुंबईच्या महापौर पदाबाबतही शहा यांनी हस्तक्षेप केला म्हणून शिवसेनेला महापौर पद मिळाले असा गौप्यस्फोट केला आहे. आधीच मुंख्यमंत्री पदाच्या वाटपावरून सेना-भाजप नेते हे एकमेकांवर आरोप करत असतांना आता पाटील यांनी मुंबईच्या महापौर पदाबाबतही मोठे वक्तव्य करत शिवसेनेवर एकप्रकारे भाजपने मेहरबानी केल्याची भाषा करत पुन्हा डिवचले आहे. आता यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT