सोमय्या हल्लाप्रकरणी अजित पवार म्हणाले, ‘होय...केंद्रीय गृहविभागाची टीम पुण्यात आलीय’!

कुणाला काही त्रास होणार नाही, याची जबाबदारी राज्यातील पोलिसांची असते.
Ajit Pawar on Kirit Somaiya Attack
Ajit Pawar on Kirit Somaiya AttackSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुण्यात झालेल्या धक्काबुकीसंदर्भात केंद्रीय गृहविभागाच्या दिल्लीच्या टीमने पुण्यात येऊन पुणे पोलिसांबरोबर चर्चा केली आहे. काय घडलं, कसं घडलं, याची माहिती त्यांनी घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. (Union Home Department team discusses with Somaiya attack case with Pune Police : Ajit Pawar)

कोविड सेंटरमधील गैरव्यवहारसंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सोमय्या हे शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) पुण्यात आले होते. तक्रार दिल्यानंतर महापालिकेत जात असताना त्यांची शिवसैनिकांशी झटापट झाली होती, त्यात पालिकेच्या पायऱ्यावर पडून सोमय्या जखमी झाली होते. भाजपच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यांची जामिनीवर सुटका झाली आहे.

Ajit Pawar on Kirit Somaiya Attack
सतीश चव्हाणांचा काँग्रेसला दे धक्का : तीन माजी नगराध्यक्षांचा एकाच दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या घटनेची सविस्तर हकीकत पत्र लिहून कळवली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहविभागाचे पोलिस अधिकारी चौकशी पुण्यात आले होते. त्यांनी पुण्यातील घटनेसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली आहे, त्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Ajit Pawar on Kirit Somaiya Attack
औरंगाबादेतील राष्ट्रवादीचा भोपळा अजितदादांना सलतोय...तो फोडण्यासाठी काॅंग्रेसचा नेता फोडला!

त्याबाबत अजित पवार म्हणाले की, कुणाला काही त्रास होणार नाही, याची जबाबदारी राज्यातील पोलिसांची असते. तसेच, राज्यात काही झालं, तर केंद्रीय गृहविभाग माहिती घेत असतो. तशी माहिती सोमय्या प्रकरणी केंद्रीय पोलिसांनी घेतली. केंद्रीय संस्थांबद्दल मला काही बोलायचे नाही, असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला भाजप खपवून घेणार नाही. आम्ही यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. सोमय्यांवर झेड दर्जाची सुरक्षा असतानाही हल्ला झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सुरक्षा प्रमुख हे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. परिणामी सोमय्या यांच्या हल्ल्याप्रकरणी हल्ला करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.

सोमय्या हल्ला प्रकरणी केंद्राच्या सुरक्षा प्रमुखांनी पुणे पोलिस आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणात पुणे पालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचीही चौकशी होणार आहे. सुटीचा दिवस असूनही पालिकेच्या आतमध्ये १०० लोक कसे घुसले? तसेच, केंद्रीय पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पोलिस आयुक्तांवरही दबाव असल्यामुळे त्यांनी कलमे लावली आहेत. त्यामुळे केंद्रातील सुरक्षा प्रमुखांनी पुण्याच्या आयुक्तांना त्याची वेगळी तक्रार दाखल करायला सांगितली आहे; अन्यथा केंद्रातील सुरक्षाप्रमुख न्यायालयात जातील, असे पाटील यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com