Kirit Somaiya sarkarnama
मुंबई

सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजूर

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २५ नोव्हेंबरला होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शिवडी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोमय्यांना १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. (BJP leader Kirit Somaiya granted bail)

सोमय्या आज (ता. ५ ऑक्टोबर) शिवडी न्यायालयासोमर हजर झाले. सोमय्या यांनी ट्वीटर वरुन केलेल्या ट्वीट प्रकरणी दोषी नसल्याचा दावा केला. प्रवीण कलमे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कथित बदनामीकारक वक्तव्यासाठी सोमय्या यांच्याविरोधात अर्थ स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते कलमे यांनी दोन स्वतंत्र बदनामीचे खटले न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २५ नोव्हेंबरला होणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग आणि एसआरए तसेच म्हडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून १०० कोटी रुपये वरुल करण्याते आदेश कलमे यांना दिले आहेत. कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी एप्रिल महिन्यात केला होता. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे संस्थेची बदनामी झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

दरम्यान, सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे विविध आरोप केले आहेत. मात्र, आता कलमे यांनीसुद्धा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोन बिल्डरसाठी सोमय्या यांनी जिवाचे रान केले आहे. त्यांच्याकडून सोमय्या यांच्या संस्थेला आर्थिक मदत येते, असा आरोप कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT