मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मागील 29 तासांपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. कोणताही आदेश अन् एफआयआरशिवाय पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर देशातील राजकारण तापलेले आहे. मात्र, केंद्र सरकार किंवा उत्तरप्रदेश सरकारकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार असो वा उत्तरप्रदेश सरकार असंवेदनशील, असल्याची टीका त्यांनी केला. (NCP President Sharad Pawar criticizes the Central Government)
लखीमपूर घटनेसंदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्यांची जबाबदारी भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. मात्र, फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. या घटनेबद्दल दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येत असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यांच्याकडे हुकूमत आहे म्हणून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सफल होणार नाहीत. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असेही पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाही आहे. जालियनवाला बाग मध्ये जशी परिस्थिती झाली होती. तीच परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे, असा हल्लाबोल पवार यांनी केला. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, ते आंदोलन शांतीने सुरू आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांवर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. लखीमपूर इथे जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते. आपल्या मागण्या मांडत होते. त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे पवार म्हणले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.