अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Amravit District Bank) निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. आज ता. ५ ऑक्टोबर मतमोजणी होत आहे. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव करत निवडणुकीत दोन मतांनी विजय मिळवला. बच्चू कडू विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. (Bachchu Kadu victory in Amravati District Bank)
विदर्भातील सर्वांत मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यावेळी लश्रवेधी ठरली होती. यावेळी 94 टक्के मतदान झाले होते. यामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे सहकार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत होती. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडूसह तीन आमदार आणि अन्य दिग्गज नेते मैदानात उतरले होते. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर विरुद्ध बच्चू कडू असी लढत असल्याने याकडे सगळ्यांच लक्ष लागले होते. चांदूरबाजारमध्ये बच्चू कडू विरुद्ध बबलू देशमुख यांच्यात काटे की टक्कर होती. मात्र, यामध्ये बच्चू कडू यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीसाठी १६८७ मतदार होते. 17 जागेसाठी 48 उमेदवार रिंगणात होते. ठाकूर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांसह अन्य राजकीय आणि सहकारातील बड्या लोक या पॅनलमध्ये प्रत्यक्ष उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरुद्ध बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल आहे. भाजपचे, माजी मंत्री भैय्यासाहेब देशमुख आणि आमदार प्रताप अडसड पॅनलचे काम पाहत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.