Nitesh Rane on Nawab Malik  Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane: नवाब मलिक हा माझा टास्क नाही; भाजप आमदार नीतेश राणे असे का म्हणाले...

Nitesh Rane on Nawab Malik Over Ajit Pawar Meeting: नवाब मलिक यांच्याविषयी भाजपचे प्रवक्ते अधिकृत भूमिका मांडतील. मला एक टास्क दिला आहे, मी त्यावर बोलतो, असे सांगून नवाब मलिक यांच्यावर बोलणे नीतेश राणेंनी टाळले.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकीला नवाब मलिक हजर होते. यावरून विरोधकांनी भाजपला घेरले आहे. भाजप आमदार नीतेश राणे यांनी तो काही माझा टास्क नाही, असे म्हटले आहे.

भाजप आमदार नीतेश राणे यांनी आमदार नवाब मलिक यांच्यावर बोलणे टाळले. तो माझा टास्क नाही. मला जेवढा टास्क दिला आहे, तो मी मांडतो. भाजपचे प्रवक्ते त्यावर बोलतील, असे सांगून त्यांनी वादग्रस्त मुद्दा टाळला. आमच्या मित्रपक्षावर भाष्य का करू?, असेही नीतेश राणे यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवगिरी बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकीला नवाब मलिक हजर होते. यावरून विरोधकांनी भापजला घेरले आहे. भाजप देखील या विषयावर सावध प्रतिक्रिया देत आहे.

अशीच काहीशी सावध भूमिका भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी नवाब मलिक यांच्याविषयी मांडली. नवाब मलिक यांच्याविषयी भाजपचे प्रवक्ते अधिकृत भूमिका मांडतील. मला एक टास्क दिला आहे, मी त्यावर बोलतो, असे सांगून नवाब मलिक यांच्यावर बोलणे नीतेश राणेंनी टाळले.

व्होट जिहाद झालाच आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीला मुस्लिमांचे मते मिळाली नाही म्हणून रडत आहे. त्यावर भाजप आमदार नीतेश राणे म्हणाले, "व्होट जिहाद झालाच आहे. मुसलमानांची मते मिळाली नाही म्हणून कोणी रडत नाही. व्होट जिहाद झाला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या देखील पुराव्यासह मांडणी करत आहेत". एका बाजूने हिंदुंनी मतदान केले आहे आणि दुसऱ्या बाजून व्होट जिहाद झाला आहे. हे जितेंद्र आव्हाड यांनी समजावून घ्यावे आणि मगच टीका करावी, असे नीतेश राणे यांनी म्हटले

ड्रग्जच्या माध्यमातून जिहाद

मीरा भाईंदरमधील नवानगरसारखा परिसर साफ करत नाही. स्वच्छता करत नाही. तेथील बांगलदेशी आणि रोहिंग्यांसारखे मुसलमान हटकवत नाही, तोपर्यंत ड्रग्जचे प्रकार कमी होणार नाही. ड्रग्जच्या माध्यमातून जिहाद पसरवणे हे बांगलादेशी आणि रोहिंग्यांसारख्या मुस्लिमांचे काम आहे. मीरा भाईंदर ड्रग्जमुक्त करायचे असेल, तर सर्व परिसर बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान मुक्त करा, म्हणजे सर्व प्रश्न सुटतील, असे नीतेश राणे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT