Narayan Rane, Sanjay Raut
Narayan Rane, Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Narayan Rane Slams Sanjay Raut : एखादी नोकरी असेल तर राऊतांना द्या ; राणे चिडले ; आदित्य ठाकरे बालिश...

सरकारनामा ब्यूरो

BJP Leader Narayan Rane Slams Aditya Thackeray and Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सुमारे ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्र देणार आहेत. या रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभागात नुकत्याच नियुक्त झालेल्या तरुणांना हे नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते रोजगार मेळा अंतर्गत तरूणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली आहेत. त्यानंतर राणेंनी माध्यमांसी संवाद साधला. यावेळी राणेंना पत्रकारांनी खासदार संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी राणें हे पत्रकारांवर भडकले.

मोदी ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्र देणार यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे. अशाप्रकारे नियुक्तीपत्र वाटण्याचं काम आमच्याकडे नगरसेवक आणि शाखाप्रमुख करतात, असं ते म्हणाले. राऊतांच्या या टीकेवर राणेंनी पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा राणेंनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.

किती शिवसैनिकांना नोकऱ्या दिल्या

"एखादी नोकरी संजय राऊतांना द्या" अशा शब्दात राणेंनी राऊतांची खिल्ली उडवली. “तुमच्या शाखाप्रमुखाकडे एखादी नोकरी असेल तर संजय राऊतांना द्या, ते राज्यसभेचे खासदार आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करणं त्यांनी शोभत नाही. किती शिवसैनिकांना नोकऱ्या मिळवून दिल्या हे राऊतांनी सांगावं," असे राणे म्हणाले.

"कोण आदित्य ठाकरे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'मातोश्री'वर येऊन रडले होते, असे टीका आदित्य ठाकरेंनी नुकतीच केली आहे. या टीकेबाबत राणेंनी त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंचं नाव ऐकताच राणे पत्रकारांवर संतापले.आदित्य ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला. "कोण आदित्य ठाकरे? “त्याला काय प्रतिष्ठा आहे? बालिश आहे तो. शाळेतल्या मुलांवर मला प्रश्न विचारता का?”

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT