Praveen Darekar, Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Praveen Darekar : राजकारणातील मग्रुरी अजितदादांनी अनेकदा दाखवलीय; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

Mumbai News : ..हा शरद पवारांच्या भूमिकेला छेद देण्याचा अजित पवारांचा प्रयत्न तर नाही ना?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. तसंच त्यांनी संभाजीराजेंच्या धर्मवीर या उपाधीवरही आक्षेप घेतला होता. पवारांच्या विधानानंतर राज्यात धर्मवीर की स्वराज्यरक्षक असा राजकीय वादंग पेटला आहे. आता याच वादावरुन भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरेकर म्हणाले, राजकारणातील मग्रूरी अजित पवार यांनी आपल्या विधानानं अनेकदा दाखवली आहे. जो विषय शांत झाला होता, तरीपण मी माझ्या विषयाशी ठाम आहे दाखवून अरेरावी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनीही संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास हरकत नाही असे सांगितल्यावरही त्याला छेद देण्याचा अजित पवारांचा प्रयत्न नाही ना अशी शंकाही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केली आहे.

मुंगेरीलाल के हसीन सपने...मिटकरींना टोला..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकार कोसळण्याच्या भाकितावरुन मिटकरींचा हा दावा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असेच म्हणावे लागेल असा टोलाही प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी लगावला आहे. तसेच राज्य सरकार कोसळण्याबाबत मिटकरी यांनी केलेल्या विधानांवरून दरेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.

संजय राऊत यांनीही यापूर्वी सतत अशाच तारखा देऊनही सरकारला सात महिने पूर्ण झाले. त्यामुळे हे सरकार सदैव विनाअडथळा चालण्यासाठी मिटकरी यांनीही असेच भविष्य सांगत राहावे अशी गमतीदार टीकाही दरेकर यांनी केली. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातून सुरु असलेले आऊटगोईंग रोखण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही दरेकरांनी यावेळी केली.

संजय राऊतांनी लोकांमधून निवडून यावं...

शिवसेनेने मुंबईकरांच्या घामाचा पैसा २५ वर्षे लुबाडला त्याचं प्रथम आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यावं. तर निवडणुकांबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे केवळ राजकीय नौटंकी आहे. निवडणुकांचे वेळापत्रक सरकार ठरवित नाही. तरीही सर्व ताकदीनीशी भाजपा निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे. राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून त्यांचा उद्देश सफल झाला आहे. त्यांची गांधी घराण्याशी असणारी जवळीक आता बाहेर येत आहे. राऊत काँग्रेसमय झाले असून त्यांनी लोकांमधून निवडून यावे असे खुलं आव्हानही दरेकर यांनी राऊतांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT