Thackeray-Shinde News : 'साहेब मी गद्दार नाही..' 'त्या' जाहिरातीतून राऊतांनी पुन्हा शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळले

दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या 23 जानेवारीला जयंती आहे
Thackeray-Shinde News
Thackeray-Shinde News
Published on: 
Updated on: 

Thackeray-Shinde News : दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या 23 जानेवारीला जयंती आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असेल्या दैनिक ‘सामाना’तील पहिल्या पानावरील जाहिरातीची मोठी चर्चा रंगली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार सुनील राऊत यांनी सामनाच्या पहिल्या पानावर मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत 'साहेब मी गद्दार नाही…'असा ठळक मजकूर छापण्यात आला आहे.

राऊत बंधुंनी या जाहिरातीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट त्यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्त राऊत बंधुंनी सामनाच्या पहिल्या पानावर ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Thackeray-Shinde News
Pune MNS News: धक्कादायक! कुटुंबीयांसमोरच मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार

या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांच्या गेलेल्या 40 गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद… जय महाराष्ट्र, असा मजकूर संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी जाहिरातीत लिहीला आहे.

या जाहिरातीत फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असून सर्वात वर शिवसेनचं मशाल चिन्हंही आहे. त्याच्या बाजूला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं पक्षाचं नावही देण्यात आलं आहे. इतकंच नाही तर, या जाहिरातीत शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळत 'गद्दार' हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे गट या जाहिरातील उत्तर कशा पद्धतीने देणार याकडेराजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

उद्या (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर भेट देऊन अभिवादन करणार आहेत. तर शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार अभिवादनासाठी येतात का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com