Praveen Darekar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Praveen Darekar News : जाहिरातीने युतीत मिठाचा खडा; दरेकरांची उघड नाराजी; मुख्यमंत्री शिंदेंपेक्षा फडणवीसांना...

Devendra Fadnavis News : 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' अशी एक जाहीरात आज (ता.१३) सर्व वर्तमान पत्रांमध्ये जाहिर झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Survey About Chief Minister post : 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' अशी एक जाहीरात आज (ता.१३) सर्व वर्तमान पत्रांमध्ये जाहिर झाली आहे. या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर केली आहे. यावरुन भाजप नेत्यांची उघड नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपचे (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) म्हणाले, एखाद्या सर्व्हेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पसंती दर्शवली असले तर आम्हाला आनंदच आहे. ते आमच्या युतीचे मुख्यमंत्री आहेत. जाहिरात करण्यात देण्यातही आमची अडचण नाही. मात्र, यामध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती दाखवली आहे, आणि देवेंद्र फडणवीसांना कमी दाखवण्याची गरज नव्हती.

त्यामध्ये जर समजा एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. यामध्ये कुणाचा काही उद्देश आहे का? त्यामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे का, असे सवला दरेकर यांनी उपस्थित केले. अशी जाहिरात देणे युतीसाठी योग्य नाही. युतीचे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न आहे.

शेवटी लोक लोकप्रियता ठरवत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही सर्व्हे करावे लागले नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेते म्हणुनही फडणवीसांचे काम लोकांनी पाहिले आहे. आताही १० महिन्यांच्या काळामध्ये त्यांनी चांगला अर्थसंकल्प देण्याचे काम केले. मागील १० वर्षापासून त्यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे आम्हाला शिंदे यांच्या लोकप्रियतेचे दु:ख नाही. मात्र, फडणवीसांना कमी दाखवणे योग्य नाही, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्व्हेमध्ये भाजपला 30. 02 टक्के तर शिवसेनेला 16. 02 टक्के लोकांनी पंसंती दिली आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे 26. 01 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23. 02 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या जाहीरातीत फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी जास्त पसंती दिल्याचे नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT