Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री शिंदेंसोबचा देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द; राजकीय वर्तुळात चर्चा...

Kaulhapur News : राज्य सरकारचा आज (ता.१३) कोल्हापूरमध्ये 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम होत आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Devendra Fadnavis, Eknath Shinde: Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : राज्य सरकारचा आज (ता.१३) कोल्हापूरमध्ये 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम होता. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र, फडणवीसांचा दौरा अचाणकपणे रद्द झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई आणि दिपक केसरकर यांनी दिली. देसाई म्हणाले, फडणवीस यांच्या ऐवजी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरला (Kaulhapur) जाणार आहेत. तसेच भाजपच्या (BJP) नेत्यांची मी स्वत: बोलेल, एखाद्या जाहिरातीबद्दल गैरसमज असतील तर ते दुर केले जातील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Sanjay Raut News : संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांच्या मर्मावर बोट; म्हणाले, "शिंदेंना बाळासाहेबांचा विसर..."

केसरकर म्हणाले, फडणवीस यांना काणाचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना हवाई प्रवास करुन नका असे सांगितले आहे. त्यांचे विमानही तयार आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्यामुळे ते जाणार नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकरणचा गैरसमज करण्याची गरज नाही. तसेच शिंदे सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांना काढले जाणार नाही.

जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) फोटो नाही, असे विचारले असता केसरकर म्हणाले, एखाद्या जाहीरातीमध्ये चुक झाली असेल तर ती दुरुस्त करता येईल. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जाहीरात ज्यांनी दिली त्यांना आम्ही विचारू, जाहिरातीचा खुलासा उद्या येवू शकतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Dombivli News : डोंबिवलीत भाजपचे टेन्शन संपेना; आता पीडित महिलेचे उपोषण

तसेच जाहिरातीच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला सांगेल. सर्व्हे आम्ही केलेला नाही. सर्व्हे झालेला आहे. युती 180 पेक्षा जास्त जागा घेऊन आम्ही निवडणून येणार आहोत, त्यामध्ये आनंद मानला पाहिजे, असेही केसरकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com