Pravin Darekar Milind Narvekar Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Pravin Darekar : ठाकरे गटातील मिलिंद नार्वेकरांच्या विजयाची भाजपला खात्री, प्रवीण दरेकर म्हणाले ' उद्धव ठाकरे...'

Pravin Darekar Milind Narvekar Legislative Council Election : विधान परिषदेच्या निवडणुकीत शंभर टक्के महाविकास आघाडीचा गेम होणार तसेच महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असे दरेकर यांनी ठासून सांगितले.

Jagdish Patil

Pravin Darekar News : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघ्या एका दिवासाचा कालावधी राहिला आहे. महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होणार याची चर्चा सुरू असताना भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटातील मिलिंद नार्वेकर विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

प्रवीण दरेकर म्हणाले, 'उद्याच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांचा पराभव उद्धव ठाकरे होऊ देणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार गट) पेक्षा उद्धव ठाकरे यांना झुकते माप देईल', असा दावा दरेकर यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत शंभर टक्के महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याचे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे. तसेच महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असे दरेकर यांनी ठासून सांगितले.

संजय राऊत शूजलेस

वरळी हिट अँड रन केस प्रकरणी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस युजलेस असल्याची बोचरे टीका केली होती. राऊतांच्या याच टीकेला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. 'संजय राऊतांच्या जिभेवर लगाम घालण्याची आवश्यकता आहे. आपण काय बोलतोय? कोणाला बोलतोय? याचे भान त्यांना राहत नाही. मी तर राऊतांना शूजलेस असे म्हणेन. बुटाची जी लेस असते त्याप्रमाणे राऊत उद्धव ठाकरेंच्या बुटाची लेस आहेत. त्यामुळे शूजलेस माणसाला युजलेसची भाषा करावी लागते.'

राऊतांचे द्वेषाचे राजकारण

संजय राऊत यांच्या बोलण्याला तारा तंत्र नसते. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या वक्तव्याची छी थू केली जाते. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. राऊत हे केवळ द्वेषाचे आणि तिरस्काराच राजकारण करतात, अशी त्यांची राज्यात प्रतिमा झाली असल्याची प्रवीण दरेकर म्हणाले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT