Lakshmi Tathe : शिंदे गटातील बडतर्फ नेत्याकडून गांजाची तस्करी, तेलंगणा पोलिसांकडून अटक

Lakshmi Tathe Arrested By Telangana Police : गांजाची तस्करी प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मी ताठे, विकास ताठे यांना वारंगळ पोलिस आयुक्तांच्या पथकाने अटक केली. या कारवाईने नाशिक शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Lakshmi Tathe Arrested
Lakshmi Tathe Arrestedsarkarnama

Nashik Drug News : काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्स तस्करी नाशिक आणि शिवसेनेचे नाव जोडले गेले होते. आता गांजा तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बडतर्फ महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

तेलंगण राज्याच्या वारंगळ पोलिसांनी गांजा तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणाचा छडा लावला आहे. यामध्ये शिंदे गटातून बडतर्फ केलेल्या नेत्या लक्ष्मी ताठे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताठे या शिवसेना शिंदे गटाच्या मोठ्या पदाधिकारी होत्या. मात्र मारहाणीच्या प्रकरणात शिंदे गटाने त्यांना बडतर्फ केले होते.

वारंगळ (तेलंगणा) येथील पोलिस पथकाने 190 किलो गांजा 8 जूनला पकडला होता. यासंदर्भात बीड आणि नगर येथील दोन गांजा तस्करांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत हा गांजा नाशिकच्या लक्ष्मी ताठे यांना पोहोचविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.

ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ताठे हिला तिच्या विकास ताठे या मुलासह अटक केली. वारंगळ पोलीस आयुक्तांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. या कारवाईने नाशिक शहरातील राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.

Lakshmi Tathe Arrested
Sudhir Mungantiwar: विधानसभेत शिवरायांच्या वाघनखांवर चर्चा, इंद्रजित सावंतांच्या दाव्यानंतर मुनगंटीवार यांचे उत्तर...

पदाधिकारी नियुक्ती वरून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयातच लक्ष्मी ताठे आणि अन्य एका महिला पदाधिकाऱ्यांत हाणामारी झाली होती. त्यानंतर मुंबई नाका पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या वादग्रस्त प्रकरणामुळे शिंदे गटातून ताठे यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई करून एमडी ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. आता तेलंगणाच्या पोलिसांनी गांजा तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यासाठी त्यांनी नाशिक मध्ये येऊन कारवाई केली आहे.

या दोन्ही प्रकरणात राजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध जोडण्यात आला आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या एका स्थानिक मंत्र्यांचा एमडी तस्कर ललित पाटील यांच्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा गांजा तस्करीशी या पक्षाचा संबंध आढळला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(Edited By Roshan More)

Lakshmi Tathe Arrested
Video Manoj Jarange Patil Shantata Rally : 'हुजूर... मराठे आ गये!' मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीच्या निमित्ताने अख्खे बीड भगवे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com