NCP Incoming News : अशोकरावांच्या गडाला सुरुंग लावत नांदेडपासूनच राष्ट्रवादीत इनकमिंग; कोण कोण संपर्कात?, जयंतरावांनी सर्वच सांगितले...

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढील आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती दिली. भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातून पक्षप्रवेश सुरू होणार असल्याचे सांगितले.
Ashok Chavan-Jayant Patil
Ashok Chavan-Jayant Patil Sarkaranam

Mumbai, 11 july : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशानंतर शरद पवार यांनी आता विधानसभेची तयारी केली आहे. शरद पवार यावेळेस राज्यात कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पक्ष संघटना मजबूतन करण्यावर त्यांचा भर आहे. त्यातूनच येत्या काही दिवसांत पक्षात प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे (NCP SharadChandra Pawar Party) इनकमिंग वाढले आहे. इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा या महिन्यात पक्ष प्रवेश निश्चित आहे. राज्यातून कोठ कोठून प्रवेश होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितली. यात भाजप नेते खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात होणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेत घवघवीत यश मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर महाविकास आघाडीला मिळालेले राज्यातील यश आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारे ठरू शकते.

राज्यातील लोकांचा खरा रोष हा राज्यातील भाजप महायुती सत्ताधाऱ्यांवर आहे. त्यांच्या कट कारस्थानावर आहे. त्यांच्या चुकीच्या आणि वेठीस धरणाऱ्या राजकारणावर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेडसह लातूर, धुळे आणि नाशिकमधील देवळाली प्रवरामधील अनेक नेते, पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पक्षप्रवेश करणारे हे आमच्यापासून फुटून गेलेले कार्यकर्ते नेत्यांच्या संपर्कात आहेत.

Ashok Chavan-Jayant Patil
Jayant Patil : दिवा विझताना जास्त फडफडतो...तशी महायुती सरकारची सध्याची अवस्था : जयंत पाटील यांची टीका

सध्या या सर्वांचे मुंबईत छोटेखानी पक्षप्रवेश होत आहेत. परंतु आत्ता जे पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मोठे मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. एक प्रकारे विधानसभेची तयारी सुरू असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी देखील दोन दिवसांपूर्वी पिंपरी आणि भोसरी येथे 20 जुलैला पक्षात मोठे नेते प्रवेश करत असल्याचे म्हटले होते. 'आगे आगे देखो होता है, क्या!', अशी शेरेबाजी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आणि संघटनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेपूर्वी होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राज्यातील दिग्गज नेत्यांना धक्का देणार असल्याचे दिसते. दिग्गज नेत्यांच्या भोवती असलेले नेते आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Ashok Chavan-Jayant Patil
Rahul Gandhi : राहुल गांधींना थप्पड मारली पाहिजे म्हणणाऱ्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com