Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar On Thackeray: सत्ता गेल्यानंतर ठाकरेंची स्वार्थी भूमिका; मुनगंटीवारांचा हल्लाबोल

Sudhir Mungantiwar : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठकरेंना डिवचले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत सत्ता गेल्यावर स्वार्थी भूमिका कुठून येते, असा खोचक टोला लगावला आहे. "रोज शिवबंधन बांधतोय, अशा बातम्या आम्ही ऐकतो. मग तुम्ही इतरांना तुमच्या पक्षात घेतले तर तुम्ही महान आणि आम्ही घेतले तर लहान, अशा पद्धतीची स्वार्थी भूमिका कशी येते", अशी टीका करत मुनगंटीवारांनी ठाकरेंना खोचक सवाल केला आहे.

केंद्रात भाजपची सत्ता असल्याचे काहींना दुःख आहे. मात्र, पुढचे 25 वर्ष आम्हाला कोणी हलवणार नाही, असे सांगत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कुणी हनुमान चालीसा बोललं तरी जेलमध्ये टाकले जायचे, किती तो अंहकार होता, असा हल्लाबोल मुनगंटीवारांनी ठाकरेंसह विरोधकांवर केला.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीनंतर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, आता यावरूच सुधीर मुनगंटीवार यांनी ठकरेंना डिवचले आहे. "शरद पवार सोबत राहतील की नाही, अशा पद्धतीची भिती ठाकरेंना सतावत असल्याचे सांगत त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे", असा जोरदार हल्लाबोल मुनगंटीवारांनी केला.

सर्व सामान्यांचे प्रश्न मांडायचे नाही, पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची. पण हीच त्यांची वृत्ती त्यांना संपावत असल्याचे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी ठकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे. यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT