Deepali Sayyed and Raj Thackeray
Deepali Sayyed and Raj ThackeraySarkarnama

Deepali Sayyed On MNS: जेवढे रस्त्यांवर खड्डे, तेवढेच मनसेचे कार्यकर्ते; दीपाली सय्यद यांनी केले 'मनसे'चे मोजमाप

Political News: अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी 'मनसे'वर निशाणा साधला
Published on

Mumbai News : रस्त्यांवरचे खड्डे, टोल वसुलीवरून ‘खळखट्याक’ करणाऱ्या मनसेवर अभिनेत्री दीपाली सय्यद या चांगल्याच भडकल्या आहेत. खड्ड्यांवरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच सय्यद यांनी काही सल्ले दिले. राज्यात मनसेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, तेवढेच खड्डे असल्याचे सांगून सय्यद यांनी राज यांच्या पक्षाचे मोजमापच करून टाकले.

दुसरीकडे, खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसांचे असताना मात्र, महिनाभर तुरुंगात जाऊन देशाचे नुकसान का करता, असा तिरकस सवालही त्यांनी केला. राज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सल्ला देण्यावर सय्यद थांबल्या नाहीत. युवा नेत्याला घराबाहेर काढून कामाला लावा, हेही सांगत त्यांनी अमित ठाकरेंनाही लक्ष्य केले. सय्यद यांच्या भूमिकेमुळे आता मनसेच्या कार्यकर्त्यांचे पित्त खवळणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून राज ठाकरे यांनी बुधवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेत या महामार्गाची पाहणी केली होती. मात्र, राज ठाकरे या मेळाव्यावरुन परतत नाही तोच मनसैनिकांनी या महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या ऑफिसची तोडफोड केली होती. यावरूनच आता दीपाली सय्यद यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com