Mumbai News : राज्यात मराठा आरक्षणावरून संघर्ष पेटलेला आहे. यात ओबीसी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी धडपडतो आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनांनी दीड-दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. अजूनही त्यांचे आंदोलन सुरू आहे.
25 जानेवारीपासून ते सामूहिक बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करत आहेत. यातच भाजप नेते माधव भंडारी यांनी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाविषयी मत मांडलं आहे.
विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार ठाण्यातील कल्याण इथं झाला. कल्याण ब्राह्मण सभेच्यावतीनं आचार्य अत्रे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी माधव भंडारी यांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे की नको, यावर भाष्य केले. आमदार किरण सामंत, संजय केळकर, भाजप (BJP) नेते माधव भंडारी, सांगलीचे आमदार सुधीर परशुराम गाडगीळ, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
माधव भंडारी म्हणाले, "ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठे आहे. देशात समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्यामुळे आपल्याला आरक्षणाची (Reservation) गरज नाही". आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू, असंही माधव भंडारी यांनी म्हटलं.
'आपला टक्का वाढवला पाहिजे, असे सांगताना राजकारणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का बघितला जातो. जोपर्यंत आपला टक्का वाढत नाही, आपली रेष वाढत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळणार नाही.आपण आता साडेदहा-अकरा टक्क्यांच्या घरात आहोत आणि हा काही लहान आकडा नाही. परंतु गेल्या काही वर्षात ज्यापद्धतीने आपल्या समाजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ट वर्गाकडून सुरू आहे, ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही, असं वाटायला लागलं आहे', असे माधव भंडारी यांनी म्हटले.
'पूर्वीचा इतिहास काय होता, त्या चर्चेला काही अर्थ नाही. आपण ब्राह्मण म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या एकट्या ब्राह्मणाला संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन करताना लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरून परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटी मागणी करावी', अशी मागणी भंडारी यांनी यावेळी महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्याकडे केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.