Ritu Tawde devendra Fadnavis .jpg Sarkarnama
मुंबई

BMC Mayor: भाजप महापौरांनी डावलला मुख्यमंत्री फडणवीसांचाच आदेश? 'त्या' वादग्रस्त बदल्यांसाठी तावडेंचं प्रशासनाला पत्र

BMC Officers Transfers: मुंबई महानगरपालिकेत सत्तांतरानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्रशासक काळात करण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनियमिततेचा असल्याचा गंभीर आरोप झाले होते.

Deepak Kulkarni

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेत सत्तांतरानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्रशासक काळात करण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनियमिततेचा असल्याचा गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर या आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित बदल्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्‍यांकडून या स्थगिती दिली असतानाही महापौर रितू तावडे यांनी संबंधित बदल्यांच्या कार्यवाहीबाबत प्रशासनाला पत्र लिहिल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेत प्रशासकराज सुरू असतानाच सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या बदल्यांबाबत तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती.

तसेच मुख्यमंत्र्यांचा हा स्थगिती आदेश अजूनही कायम असतानाही महापौर रितू तावडे यांनी उचलेल्या पावलामुळे मुंबई महापालिकेत सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा झडू लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्थगितीचा आदेश डावलत महापौर रितू तावडेंनी संबंधित बदल्यांसाठी थेट अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना पत्र लिहिलं आहे.

महापौर रितू तावडे यांनी या बदल्यांच्या कार्यवाहीबाबत अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात महापौर तावडे यांनी 'म्युनिसिपल इंजिनिअर युनियन'च्या एका निवेदनाचा दाखला देत बदली आदेशांच्या अंमलबजावणीबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचं समोर आलं होतं.

मुंबई महापालिकेत प्रशासक काळात झालेल्या मोठ्या प्रमाणांवरील या बदल्यांबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनीही त्यानंतर या तक्रारींची गंभीर दखल घेत या बदल्यांना स्थगिती दिली होती.

पण आता मुंबई महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपकडून रितू तावडे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. पण आता तावडे यांनी बदल्यांसाठी आग्रही भूमिका घेतल्यानं मुंबई भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेने कौल दिला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी 118 जागा मिळवत विजय सत्ता मिळवली असली तरी,त्यांच्यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे सत्तास्थापन केली होती. विशेषतः महापौर पदावरून या दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली होती.

गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या एकसंध शिवसेनेला दूर ठेवत मुंबईत आता भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. भाजपने मुंबईचा महापौर निवड करताना मोठी खेळी केली होती. घाटकोपरमधील भाजपच्या अनुभवी आणि आक्रमक नगरसेविका असलेल्या रितू तावडे यांची महापौरपदी निवड केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT