Thackeray Vs Shinde : उद्धव ठाकरेंना शिंदेच्या शिलेदाराकडून आमदारकीची ऑफर, सुषमा अंधारेंकडून पलटवार

Sushma Andhare Criticises Naresh Mhaske : उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेची मुदत मे महिन्यात संपत आहे. त्यापूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याने सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेंसह, म्हस्केंवर जोरदार टीका केली.
Sushma Andhare Vs Naresh Mhaske
Sushma Andhare Vs Naresh MhaskeSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : उद्धव ठाकरें यांची विधान परिषदेची मुदत मे महिन्यात संपत आहे. उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर पुन्हा जाण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आमदरकीच्या पाठींब्यासाठी एकनाथ शिंदेंना फोन करा, ते सगळं सोडून तुमच्या मागे उभे राहतील, अशी खुली ऑफर दिली.

नरेंद्र म्हस्केंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्केंवर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, 'ज्या माणसाने हसत हसत राजपाट सोडला, मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामाही सहजरित्या दिल्या. त्यांना तुम्ही एका विधान परिषदेचे अमिष कसले दाखवताय.'

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'खरे तर नरेश म्हस्केंना किती सिरीयस घ्यायचं हा प्रश्नच आहे. नरेश म्हस्के असतील किंवा आणखी दोन चार माणसं असतील त्यांची गेल्या तीन चार दिवसांपासून नौटंकी चालू आहे. याला फोन करा त्याला फोन करा.'

Sushma Andhare Vs Naresh Mhaske
Swatantryaveer Savarkar Case: राहुल गांधींच्या अडचणी मिटल्या? सावरकर मानहानी प्रकरणी नाशिक कोर्टाचा मोठा दिलासा!

'मुळात एकनाथ शिंदेंनी म्हस्केंना लोकसभा दिली. पण शिंदें हे देण्यासाठी ताकद ही पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच दिली होती. त्यांना नगरविकास मंत्री हे ठाकरेंनीच केले. त्यांचे पुत्र श्रीकांत ठाकरे यांना देखील खासदारकी ठाकरेंनीच दिली. उद्धवसाहेबांनी जर एकनाथ शिंदेंना ताकद दिली नसतील तर शिंदेंना तरी म्हस्केंना खासदारकी दिली असती का?', असा टोला देखील त्यांनी लगावला.

Sushma Andhare Vs Naresh Mhaske
MHADA Housing Scam: दीडशे कोटींचा सदनिका घोटाळा; बिल्डरांची नावे लपविण्यासाठी आटापिटा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com