Kabutarkhana Issue Mumbai Sarkarnama
मुंबई

Kabutarkhana Issue Mumbai : मुंबईत मराठीविरुद्ध जैन वाद उफाळण्याची चिन्हं; भाजप मंत्र्यांच्या कुबतरखान्यांना, 'आम्ही गिरगावकर' चिकन-मटण सेंटरने उत्तर देणार

BJP Minister Mangal Prabhat Lodha Pigeon House Remark Sparks Protest : भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील प्रत्येक वार्डमध्ये कबुतरखाने उभारण्याची भाषा केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

Pradeep Pendhare

Mangalprabhat Lodha statement controversy : मुंबईतील कबुतरखान्याचा वाद मध्यंतरी चांगलाच पेटला होता. मराठी एकीकरण समितीने या वादात थेट उडी घेतल्याने, या वाद कम्युनिटीकडे वळला होता. वरकरणी हा वाद शांत वाटत असला तरी, त्याला राजकीय हवा देण्याचा प्रकार सत्ताधारी भाजपकडून होताना दिसतो आहे.

भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबुतरखाने उभारण्यावर केलेले विधान आणि त्याला 'आम्ही गिरगावकर' संस्थेने चिकन-मटण सेंटर उभारून जशास-तसे उत्तर देण्याची केलेली भाषा, यावरून हा वाद मराठी विरुद्ध जैन, असा उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मुंबईतील (Mumbai) प्रत्येक वाॅर्डमध्ये कबुतरखाने उभारले जातील, अशी घोषणा केली. मंत्री लोढा यांच्या या भूमिकेवर मुंबईतील सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील संघटनांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

'आम्ही गिरगावकर' या संस्थेने भाजप (BJP) मंत्री लोढा यांच्या या भूमिकेवर आक्रमक भूमिका घेतली आहे. जेथे-जेथे कबुतरखाने उभारले जातील, तेथे-तेथे चिकन-मटन सेंटर उभारले जातील, असा इशारा 'आम्ही गिरगावकर' संस्थेने दिला आहे. या संस्थेने घेतलेल्या भूमिकेमुळे मराठीविरुद्ध जैन, असा वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मंत्री लोढा यांच्या घोषणेला ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेने तीव्र विरोध केला आहे. ‘स्वतःच्या विभागातील मराठी लोकांना हिंदुत्वाच्या नावाखाली मूर्ख बनवून, मंदिर पाडून डेरासर उभे करणाऱ्या मंत्री लोढा यांनी आता कबुतरखान्यांचा खेळ सुरू केला आहे. हा डाव आम्ही हाणून पाडू,’ असा इशारा संस्थेने दिला आहे.

मंत्री लोढा यांच्या राहत्या इमारतीमध्ये आणि ज्या -ज्या ठिकाणी कबुतरखाने उभारले जातील त्या-त्या ठिकाणी आम्हाला चिकन-मटण सेंटर उभारण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे पत्र ‘आम्ही गिरगावकर’ने महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा राजकीय रंग घेण्याची चिन्हे आहेत.

आम्ही गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी, मंत्री लोढा यांची कबुतरखान्यांची घोषणा आम्हाला मान्य नाही. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कबुतरखाने असतील तर तिथेच आम्हालाही चिकन-मटण सेंटर उभारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही. हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT